पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उद्दिष्ट आहे. दुसरे गृहीत आहे की तुम्ही सूर्यनमस्कार घालण्यास शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आहात. तिसरे गृहीत आहे की तुम्ही दररोज सूर्यनमस्कार घालता आहात. तुमची सूर्यनमस्कार घालण्याची क्षमता पंधरा मिनिटांमध्ये किमान तीन + १ ते कमाल पन्नास +०१ अशी आहे. (२४+२४+०१) खेळाडू, कसरतपटू, धावपटू, पहिलवान तसेच पोहणे, शरीरसौष्टव इत्यादी स्पर्धेमध्ये भाग घेणारे स्पर्धक यांनी आपल्या उद्दिष्टाप्रमाणे सूर्यनमस्कार संख्येत वाढ करणे अपेक्षित आहे. या साठी प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घ्यावे. त्याच प्रमाणे व्याधी निवारणासाठी, मेदवृद्धी / वजन कमी करण्यासाठी, आणि इतर रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेऊन सूर्यनमस्कार साधनेस सुरूवात करावी. (संदर्भ घ्याः नोंदणी अर्ज, सूर्यनमस्कार तक्ता.) सूर्यनमस्काराची संख्या वाढवितांना किंवा कमी करतांना ती हळू हळू करावी. (सर्वसाधारणपणे तीन आठवड्याला तीन नमस्कार. ) वय वर्षे ०९ ते १२ वर्षे १३ ते १५ वर्षे सूर्यनमस्कार संख्या १२+०१ ते २४+१ (स्नायूंची लवचिकता व सूर्यनमस्काराची सवय पकडण्यासाठी) २४+१ चे दोन ते चार आवर्तन समंत्रक. शक्य असेल तेंव्हा प्राणायामाचा सराव. १६ ते ४० वर्षे ३ २४+१ चे चार ते वीस आवर्तन समंत्रक. शक्य असेल तेंव्हा प्राणायामाचा सराव. 2 एक वर्षभर दररोज १२० सूर्यनमस्कार घाला. सैनिकास आवश्यक असलेले शरीर तयार होते. या दरम्यान ग्रंथराज (लक्ष) दासबोधाची समजून-उमजून ती पारायणे करा. राष्ट्रसेवेची प्रखर मानसिकता तयार होते. या प्रकारचे एक लक्ष साधक तयार करण्याचा संकल्पन मसूलकर आश्रमाचा होता. सूर्यनमस्कार एक साधना २१९