पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्कार व त्याचे परिणाम याचे समीकरण हे व्यक्तीनिष्ट असतात. IP सूर्यनमस्कार कोणत्या प्रकारे व किती वेळेत घातले जातात यावरही ही संख्या अवलंबून असते. संथ गतीने सूर्यनमस्कार शरीर शुद्धीसाठी घातले जातात. गतीयुक्त सूर्यनमस्कार शरीर वृद्धीसाठी घातले जातात. सूर्यनमस्कार ही योगासनांची गुंफलेली शृंखला आहे. व्यायाम म्हणून योगासने करावयाची झाल्यास प्रत्येक आसन चार-पाच मिनिटे करणे अपेक्षित आहे. सूर्यनमस्कारामध्ये बारा शरीर स्थिती आहेत. एक सूर्यनमस्कार योगासनाचा व्यायाम म्हणून घालायचा असल्यास १२ x ४ मिनिटे किमान लागतात. पण एक सूर्यनमस्कार घालण्यासाठी सर्वसाधारणपणे एक मिनिट आपण गृहित धरतो. तसेच बारा स्थितीचा हाच सूर्यनमस्कार चार श्वासामध्ये पद्धतशीरपणे घालता येतो. म्हणजे एका मिनिटाला तीन सूर्यनमस्कार झाले. मग सूर्यनमस्कारास लागणाऱ्या वेळेचे मोजमाप करायचे कां त्यांची संख्या मोजायची? परिणामांची मोजपट्टी तयार करण्यासाठी दोन्ही प्रकार भरवशाचे नाहीत. कारण त्यामध्ये व्यक्तीपरत्वे नेहमीच बदल होत असतो. - अशक्तपणा, आजारपण, काळजी - शोक - चिंता याचा परिणाम सूर्यनमस्कार घालण्याच्या क्षमतेवर होतो. शरीरातील स्नायू फार कामचुकार आहेत. त्यांच्या कलाने हळू हळू त्यांना कामाला लावायचे आहे. ९५% पेक्षा अधिक स्नायू सूर्यनमस्कारात कार्यरत झाल्यावर सर्व फायदे मिळण्यासाठी सूर्यनमस्कार संख्येला शून्य महत्त्व उरते. स्नायुंना किती वेळ लागेल हे आपल्या हातात नाही. आपण फक्त प्रयत्न करायचे. सबुरी-सातत्य ठेवायचे. साधकाशी सूचना साधना आणि फक्त साधना. एवढी एकच सूचना लक्षात ठेवायची. ही झाली सैद्धांतिक बाजू. व्यवहारिक भाषेत याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. हे विवेचन करतांना प्रत्येक सूर्यनमस्कार साधकाने तीन पायाभूत कौशल्ये प्राप्त केलेली आहेत असे गृहित धरलेले आहे. एक कोणतेही स्नायुंचे किंवा इतर दुखणे सुरू न होता (विकोपाला न जाता) सूर्यनमस्कार साधना अखंडितपणे सुरू ठेवणे हे आपले दररोजचे प्रथम सूर्यनमस्कार एक साधना २१८