पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्राणायाम प्रशिक्षण वर्गामध्ये ठेवलेला आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास न होता सूर्यनमस्कार साधना अखंडितपणे सुरू ठेवणे हे आपले दररोजचे उद्दिष्ट आहे. हे लक्षात घेऊन तुमच्या सोयीप्रमाणे या क्रमात बदल करा. त्यामध्ये तुम्हाला आलेल्या अनुभवांची नोंद ठेवा. तुमचे अनुभव सर्वांनाच मार्गदर्शन करणारे, प्रेरणा देणारे ठरणार आहेत. कृपया संपर्कात रहा. प्रश्न- अ) व्यायामाचे सर्व फायदे मिळण्यासाठी कोणत्या वयात किती सूर्यनमस्कार दररोज घालावेत ? ब) सूर्यनमस्कार कसे घालावेत ? क) सूर्यनमस्कार घातल्यानंतर किती वेळाने नाष्टा करावा ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती शंका समाधान- अ) 'अकाल मृत्यू हरणं रोग व्याधि विनाशनम्' असा आहे सूर्यनमस्काराचा महिमा! किती सूर्यनमस्कार घातले की हे सर्व फायदे मला मिळतील ही व्यावहारिक उत्सुकता या प्रश्नाच्या पाठीमागे कदाचित असेल. सूर्यनमस्कार ही स्वयं साधना आहे. ही साधना करतांना या प्रश्नाचे उत्तर दररोज आपण अनुभवत असतो. पण तरीही साधक हा प्रश्न विचारतात. आपली प्रगती आजपर्यंत किती झाली याची अनुभूती त्याला मिळालेली असते. पण अद्याप अंतीम ध्येय गाठण्यासाठी किती प्रगती करणे बाकी आहे याचा अंदाज घेण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो असे मला वाटते. साधकाचे वय, सूर्यनमस्कार संख्या व होणारे फायदे असे गणिती भाषेतील वस्तुनिष्ट कोष्टक या साधनेत उपयोगी पडणार नाही. कारण वजन- उंची- बॉडीमास-वय व्यवसाय, व्यसन अयोग्य सवयी, रोग, व्याधी, अनुवंशिक विकार, शरीराचा आकार, सूर्यनमस्कार साधनेकडे बघण्याची दृष्टी याचाही प्रभाव सूर्यनमस्कार किती आणि कसे घातले जातात यावर होत असतो. त्यामुळे सूर्यनमस्कार एक साधना २१७