पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रक्ताभिसरण प्रत्येक पेशीपर्यंत खोलवर व पूर्ण क्षमतेने पोहचते. या सर्व गोष्टी विचारात घेऊन व्यायामातील श्रमाची प्रतवारी करून त्यांचा क्रम ठरवायचा झाल्यास तो साधारणपणे खालील प्रमाणे ठेवण्यास हरकत नाही. व्यायामाचा चढता क्रम- सकाळी बाहेर फिरायला जाणे, चालणे, पळणे, इतर प्रकार करणे, व्यायाम शाळेत जाणे, मैदानी खेळ खेळणे, अंघोळ करणे / नदीवर, पोहण्याच्या तलावात पोहणे, प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार घालणे. व्यायामाचा उतरता क्रम- योगमुद्रा, संध्याविधी, पूजाअर्चा, जप इत्यादी करणे. यानंतर भरपेट नाष्टा करणे अणि दिवसाच्या कामाला लागणे. वर दिलेल्या क्रमामध्ये श्रमाची चढती प्रतवारी सूर्यनमस्कार घालणे येथे थांबते. नंतर स्नायूंना विश्रांती देणे त्यांना शांत करणे (काम डाऊन) सुरू होते. वर दिलेला व्यायामाचा क्रम फक्त एक उदाहरण आहे. उद्देश लक्षात घेऊन आपल्या सोयीप्रमाणे त्यात बदल करावयास हरकत नाही. हा क्रम हिवाळ्यातील आहे. उन्हाळ्यात वातावरणात उष्णता असते. उष्म्यामुळे थकवा जाणवतो. ऊर्जेमुळे शरीरातील स्नायुंची लवचिकता व कार्यक्षमता वाढलेली असते. यासाठी या काळात व्यायामाची मात्रा कमी केली तरी चालते. सर्वात प्रथम प्राणायाम सराव करा. त्यानंतर सर्व स्नायूपेशी उत्तेजित करणारी सूर्यनमस्कार साधना करा. येथे श्रमाची चढती कमान पूर्ण होते. कमी श्रमाचे व्यायाम प्रकार करून पेशींना शांत करण्याची श्रमाची उतरती कमान येथूनच सुरू करा. काही सांप्रदायिक संस्थेत पूरक व्यायाम प्रकार / योगासने (वॉर्मिंग अप्) नंतर सूर्यनमस्कार व शेवटी प्रार्थना असाही क्रम बघावयास मिळतो. सूर्यनमस्कार ही स्वयं साधना आहे. ती आपण स्वतः शिकायची आहे. आपल्या चुका शोधून आपणच त्या सुधारायच्या आहेत. या साधनेमध्ये मार्गदर्शन करणारा तुमचा आत्माराम आहे. त्याच्याशी सततचे अनुसंधान ठेवण्यासाठी ही साधना साधक म्हणून / विद्यार्थी म्हणूनच दररोज शिकायची आहे. सर्वभावे त्याच्याशी समरस व्हायचे आहे. हे अनुसंधान सुकर व्हावे म्हणून प्रथम श्रमाची चढती कमान आणि नंतर विश्रांतीची उतरती कमान असा क्रम सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार एक साधना २१६