पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहेत. एकदम सर्व स्नायू कामाला लावणे शक्य नाही. तसा प्रयत्न केल्यास त्रास होणारच. सर्व स्नायू व स्नायूपेशींना जागे करण्यासाठी क्रमशः प्रयत्न करतांना सोपे व कमी श्रमाचे प्रकार प्रथम करावयाचे असतात. म्हणूनच व्यायामपूर्व प्रकार (वॉर्मिंग अप्), स्नायू जागे करणे हे सर्वात प्रथम करायचे. अंघोळ या व्यायाम प्रकाराला प्रथम प्राधान्य द्यायचे. शारीरिक व्यायाम दोन प्रकारचे, घरात करण्याचे व घराबाहेर मैदानात करण्याचे प्रकार किंवा व्यायाम शाळेतील व्यायाम प्रकार व मैदानी खेळ. यामध्ये अनेक प्रकार आहेत. व्यायाम करतांना तो चढत्या क्रमाने करायचा आहे. कमी श्रमाचे व्यायाम प्रकारास सुरूवात करून आपल्या क्षमतेप्रमाणे जास्तीत जास्त श्रम देणारे व्यायाम प्रकार हळू हळू करायचे आहेत. अधिक श्रमाचे व्यायाम करणे म्हणजेच अधिकाधिक स्नायू व स्नायूपेशींचा सहभाग व्यायामामध्ये करून घेणे असा आहे. स्नायूंचे सहकार्य मिळविण्यासाठी त्यांची लवचिकता वाढवायची आहे. व्यायामामध्ये स्नायूंवर ताण दाब दिला जातो. त्यातूनच स्नायुंची ताण- दाब सहन करण्याची क्षमता हळू हळू वाढते. स्नायुंची क्षमता आकारमान किंवा वजन यावर अवलंबून नसते. हे लक्षात ठेऊन व्यायाम करायचा. व्यायामाची मात्रा जसजसी वाढेल तसा प्राणतत्त्वाचा खुराक स्नायूपेशींना अधिकाधिक प्रमाणात करायचा आहे. कारण प्राणतत्व पेशींचे प्रथम पोषण करतात. त्यांना कार्यप्रवृत्त करतात. स्नायुंचे श्रम व प्राणतत्त्वाचे पोषण यांची योग्य सांगड घातली नाही तर तो व्यायाम न होता स्नायुंना दिलेली व्यायामाची शिक्षा होते. मैदानी प्रकार सूर्यनमस्कार घातल्या नंतर केलेत तर सूर्यनमस्कार हा त्यासाठी वॉर्मिंग अप् होईल. मैदानी प्रकारात प्रगत कौशल्य मिळविणे सहज शक्य होईल. कारण सूर्यनमस्कार घातल्यामुळे शरीरातील सर्वच स्नायू काम करण्यास उत्सुक होतात. कोणत्याही कामासाठी सक्षम होतात. सूर्यनमस्कार सर्वांगसुंदर व्यायाम आहे. त्यामध्ये ९५% पेक्षा अधिक स्नायू कार्यरत होतात. कुंभक करून प्रत्येक आसन स्थिती करतांना शरीरातील सूर्यनमस्कार एक साधना २१५