पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्काराचा परिणाम रेचकापेक्षा अधिक सुकर व सुखद आहे याची प्रचिती येईल. कोठा जड असल्यास दर बुधवारी व शनिवारी सौम्य रेचक घ्या. आहारात योग्य तो बदल करा. तीन- एक आठवड्यात अपेक्षित परिणाम लक्षात येईल. तेरा आठवड्यामध्ये बद्धकोष्ट यातून पूर्णपणे मुक्त व्हाल. सर्व अनावश्यक व अपायकारक सवयी गळून पडतील. तुमच्या कामाचे ठिकाण - कार्यवेळ, तीन सत्रामध्ये काम करण्याच्या बदलत्या वेळा यामुळे सकाळी वेळ काढता येत नसेल तर सायंकाळी सूर्यनमस्काराचा व्यायाम घेतला तरी चालेल. सूर्यनमस्कार किती, कोठे, कसे, केंव्हा घातले हे महत्त्वाचे नाही. सूर्यनमस्कार साधनेवरील विश्वास, सातत्य आणि सबुरी सर्वात महत्त्वाची. दीर्घ सरावातून सूर्यनमस्काराचे सर्व फायदे पूर्णपणे मिळणार आहेत हे लक्षात ठेवा. सूर्यनमस्कार घालतांना त्याची खालील व्याख्या लक्षात ठेवा. उरसा शिरसा दृष्ट्या वचसा मनसा तथा । पदाभ्यां कराभ्यांजानुभ्यां प्रणामोऽष्टांग उच्यते ।। प्रश्न- अ) सकाळी उठल्यावर फिरावयास/पळण्यास जाणे, सूर्यनमस्कार, अंघोळ, पूजा असा क्रम ठेवल्यास चालेल का ? ब) सकाळी पूजा-अर्चा व्यायाम यामध्ये सूर्यनमस्कार केंव्हा घालावे याचे मार्गदर्शन करावे ही विनंती. शंका समाधान- अ) सकाळी उठल्यावर फिरावयास/पळण्यास जाणे, व्यायाम शाळेत जाणे नंतर अंघोळ, नंतर सूर्यनमस्कार, नंतर संध्या, पूजा-जप वगैरे करावा. सूर्यनमस्कारापूर्वी अंघोळ करणे गरजेचे आहे. याची सविस्तर चर्चा या अगोदरच्या प्रश्नामध्ये आलेली आहेच. त्याचा संदर्भ घ्यावा. ब) सूर्यनमस्कारामध्ये ९५% पेक्षा अधिक स्नायू कार्यरत करायचे आहेत. यासाठी टप्प्या टप्प्याने हळू हळू अधिकाधिक स्नायू सूर्यनमस्काराच्या कक्षेत आणावयाचे सूर्यनमस्कार एक साधना २१४