पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चहा किंवा अपेयपान करणे, रेचक घेणे इत्यादी अयोग्य व अपायकारक उपाय सुरू होतात. या अनावश्यक व अपायकारक सवयी टाळण्यासाठी खालील उपाय करून पहा. प्रत्येक शनिवारी (आठवड्याच्या सुटीचा अगोदरचा दिवस) सौम्य रेचक घ्या. 2 रेचक कोणते घ्यावे याचे मार्गदर्शन वैद्य किंवा तुमच्या आईकडून घ्या. दुसऱ्या दिवशी अपेक्षित परिणाम झाल्यास औषधाची ती मात्रा निश्चित करा. रेचकाचा उपयोग पोट साफ करण्यासाठी मदत म्हणून असावा. पोट ढवळून साफ करणे हा परिणाम नसावा. रेचक घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेत सूर्यनमस्कार घालणे सहज शक्य होईल. त्यानंतरच्या पुढील दिवशी पोट वेळेवर साफ झाले नाही तरी ठराविक वेळेला अंघोळ करा. सूर्यनमस्कार घाला. अर्ध्या तासाने पोट चांगले साफ होईल. - श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक येथे संजिवन चूर्ण (रेचक) वापरले जाते ते तयार करण्याची कृती खालीलप्रमाणे. साहित्य - बाळ हिरडे शंभर ग्राम, एरंडेल तेल वीस/पंचवीस ग्रॅम, सैंधव व पादेलोण चवीपुरते घ्या. कृती- बाळहिरडे एरंडेलाच्या तेलात परतून घ्या. ते टरारून फुगतात. हलके होतात. गार झाल्यावर, शिल्लक एरंडेल तेलासहित, बाळहिरडे मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात सैंधव व पादेलोण टाका. अर्धा चमचा हे संजिवन चूर्ण रात्री जेवण झाल्यावर घ्या. जिभेने उचलत, चव घेत, सावकाश घ्या. त्यानंतर एक छोटा ग्लास गरम पाणी प्या. चूर्ण घेतांना मधून पाणी घेतले तरी चालेल. 2 हे चूर्ण शरीरातील वात-पित्त-कफ संतुलीत ठेवण्यास मदत करते. रात्री उलटीतून पित्त बाहेर पडण्याची शक्यता असते. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना हे रेचक उपयोगी आहे. आठवड्यातून एकदा घ्या किंवा दररोज घ्या. याचा त्रास होणार नाही. सवय लागणार नाही. हे सौम्य रेचक आहे. तसेच आतड्यांसाठी शक्तीवर्धक चूर्ण आहे. सूर्यनमस्कार प्रशिक्षण वर्ग दर शनिवार सायंकाळी सुरू होतो. त्या दिवशी जेवण झाल्यावर रात्री हे चूर्ण घेण्यास सांगितले जाते. प्राणायाम, सूर्यनमस्कार करतांना स्नायुंवर ताण-दाब दिला जातो. त्यामुळे पोट साफ नसल्यास शरीरातील वात प्रवाही होऊन कोठेही धक्का देते. स्नायू दुखणे चमक येणे वगैरे त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठक्ष ही प्राथमिक प्रतिबंधक उपाययोजना आहे. सूर्यनमस्कार एक साधना २१३