पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळतो त्यावेळी हे अनावश्यक द्राव बाहेरील बाजूकडे ढकलले जातात. मोठे आतडे हे शरीरातील मलसाठा केंद्र आहे. ते रिकामे व स्वच्छ असल्यास स्नायूपेशीची स्वयंचलीत शुद्धीप्रकिया परिणामकारकपणे कार्यरत होते. सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी पोट साफ असणे आवश्यक आहे. अंघोळ झाल्यानंतर त्वचेवर जाणवणारा गारवा कमी होण्याअगोदर सूर्यनमस्कार साधनेस सुरूवात करा. सूर्यनमस्कार घालण्यापूर्वीच्या अधोरेखित केलेल्या तीनही सूचनांचे पालन सकाळी सहजी होते. ड) सायंकाळी सूर्यनमस्कार घातले तर चालतील का ? सूर्यनमस्कार घालण्या अगोदर किमान चार तास खाणे बंद ठेवणे, पोट साफ करणे व अंघोळ करणे या तीनही सूचनांचे पालन सायंकाळी करता येत असेल तर ही साधना सायंकाळी करावयास हरकत नाही. सूर्यनमस्कार करतांना नैसर्गिक आंतरकुंभक व बाह्यकुंभक होतो. त्यामुळे संपूर्ण शरीरात सारख्या प्रमाणात अधिक मात्रेमध्ये शुध्द रक्ताचा पुरवठा होतो. या कारणामुळेच सूर्यनमस्कार सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे. सूर्यनमस्कार एक साधना आहे कारण ती स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर व प्राणतत्व (चैतन्य) या तीनही स्तरावर सारख्याच प्रभावाने काम करते. शरीर- मन-बुद्धी या तिनही स्तरावर त्याची रोकडा प्रचिती आपणाला दररोज घेता येते. सूर्यनमस्कारात ९५% पेक्षा अधिक स्नायू कार्यरत करता येतात. रात्री स्नायुंची पूर्ण विश्रांती झाल्यानंतर त्यांना कार्य करण्यास उद्युक्त करणे सुकर व सुखद होते. पहाटे किंवा सूर्योदय ही वेळ संभाळता आली नाही तरी सकाळच्या वेळेत अंघोळ झाल्यावर लगेच सूर्यनमस्कार घालणे योग्य ठरेल. सूर्यनमस्कार सकाळी घालणे जमत नाही याला प्रामुख्याने एक कारण असते पोट सकाळी लवकर साफ न होण्याचे. या पोटाचे काम सुलभ होण्यासाठी तंबाखु खाणे, विडी-सिगारेट ओढणे, सूर्यनमस्कार एक साधना २१२