पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क) सूर्यनमस्कार घालण्यासाठी सकाळची कोणती वेळ उत्तम आहे? सूर्योदय किंवा सूर्योदयापूर्वी सूर्यनमस्कार घालणे सर्वात चांगले. रात्र संपलेली नाही आणि दिवस अद्याप सुरू झालेला नाही ही वेळ म्हणजे संधीकाळ. सकाळ, सायंकाळ, माध्यान्ह, मध्यरात्र हे दिवसाचे चार संधीकाळ आहेत. सूर्यनमस्कार साधनेसाठी सकाळचा प्रथम संधीकाळ सर्वात उत्तम. सकाळच्या उत्साहवर्धक व मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाशी आपण सहजपणे समरस होतो. निसर्गातील चैतन्य पंचकर्मेंद्रियांमार्फत शरीरात साठवित असतो. यात त्वचेचा सहभाग फार महत्वाचा आहे. कारण शोषण व उत्सर्जन हे आपल्या त्वचेचे दोन महत्वाचे गुणधर्म आहेत. 1 सूर्योदयाच्या वेळी सूर्यप्रकाश लाल असतो. त्यामध्ये नीललोहित किरणे, अल्ट्रा व्हॉयलेट किरणे असतात. या सौम्य शांत प्रकाश किरणांमध्ये अनेक रोग निवारण करण्याचे सामर्थ्य असते. सूर्योदयाच्या वेळी हे औषधी प्रकाश किरण सौम्य-शांत असतात. हे सूर्यतेज स्वीकार करण्याची शरीराची क्षमता सकाळच्या वेळी सर्वात जास्त असते. सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी किमान चार तास खाणे बंद ठेवावे. कारण आपण खाल्लेले अन्न पोटामध्ये साधारणपणे तीन-चार तास राहते. पोटाचा आकार वाढतो. अन्न पचनासाठी अधिक प्रमाणात रक्त पुरवठा सुरू होतो. द्रव पदार्थ एक-दीड तास पोटात असतात. या अगोदर व्यायाम केल्यास पचनासाठी अधिक प्रमाणात सुरू झालेला रक्त पुरवठा बंद होऊन तो हृदयाकडे वाढतो. परिणामी पोटाचे स्नायू दुखण्यास सुरूवात होते. पचनाचे विकार सुरू होतात. सूर्यनमस्कार घालतांना स्नायूपेशींना वारंवार ताण दिला जातो. या ताणामुळे स्नायूपेशींमधील विजातीय द्राव मोकळा होण्यास मदत होते. त्यांना जेंव्हा दाब 1 लहान मूल अशक्त असल्यास त्याला तेल तूप पचत नाही. औषधी तेलाने मॉलिश केल्यास ते शरीरात शोषले जाते. मुलाच्या अंगी लागते. डोळे/डोके शांत ठेवण्यासाठी आपण काशाच्या वाटीने तळपायावर तूप चोळतो. सूर्यनमस्कार एक साधना २११