पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. सर्व रोग, व्याधी, विकार, व्यसन यातून मुक्तता देणारी साधना आहे. हे गृहित तत्त्व सर्वांना माहीत असते. रक्तदाब, मधुमेह इत्यादी विकार बरे करण्यासाठी सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात होते आणि औषध घेण्याकडे दुर्लक्ष होते. सूर्यनमस्कार साधनेतून सर्व रोग-व्याधी- विकार-व्यसन यांना प्रतिबंध घालता येतो हे सत्य आहे. पण शारीरिक व्याधी-विकार असल्यास योग्य वैद्यकीय उपचार व सूर्यनमस्कार सराव यांचा आश्रय घेतला पाहिजे. यातून हे व्याधी - विकार त्वरित व कायमचे दूर करता येतात. असे नसते तर आयुर्वेद शास्त्राचा विकास झाला नसता. औषध व सूर्यनमस्कार जसे एकमेकास पूरक आहेत तसेच प्राणायाम व सूर्यनमस्कार एकमेकास पूरक आहेत लक्षात ठेवा. प्राणतत्त्वाचा खुराक व सूर्यनमस्कारचा व्यायाम यांचे प्रमाण जसे वाढेल तसे औषधांची गरज कमी होत जाईल. कोणत्याही वयोगटातील सूर्यनमस्कार साधकाला औषधाशिवाय संपूर्ण आरोग्याचा- शारीरिक व मानसिक - अनुभव घेता येईल याची खात्री बाळगा. प्रश्न अ) व्यायामामुळे शरीराला घाम येतो म्हणून सकाळी अंघोळीच्या अगोदर सूर्यनमस्कार घातले तर चालतील कां ? - ब) सूर्यनमस्कार घातल्यानंतर अंघोळ करून दिवसाच्या कामाला सुरुवात केलेली चांगली असे वाटते. कृपया मार्गदर्शन करावे. क) सूर्यनमस्कार घालण्यासाठी सकाळची कोणती वेळ उत्तम आहे ? ड) सायंकाळी सूर्यनमस्कार घातले तर चालतील का ? शंका समाधान- अ) सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करण्यापूर्वी अंघोळ करणे अनिवार्य आहे. अंघोळ ही शरीरातील सर्व स्नायूपेशिचे प्रथम व सर्वोत्कृष्ट असे वॉर्मिंग अप् ( शरीर संचलन) आहे. अंघोळ करतांना शरीरातील सर्व स्नायुंना गार आणि गरम असा शेक अनेक वेळा मिळतो. गरम पाणी आणि गार वातावरण असा तो असतो किंवा गरम पाण्यामध्ये गार पाण्याचा नळ सोडून जेवढे गार पाणी अंगावर घेता येईल तेवढे घ्यायचे असते. सूर्यनमस्कार एक साधना २०९