पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपूर्णपणे थांबते. स्नायुंचे दुखणे दोन / तीन दिवसात न थांबल्यास काहीतरी चूक होते आहे हे पक्के समजा. कोणत्या कारणाने स्नायू दुखत आहेत याचा शोध घेत व्यायाम हळुवारपणे करा. कोणत्या आसनामध्ये चुकीचा ताण-दाब दिलेला आहे हे निश्चित करा. त्याच्या विरुद्ध प्रकारचा ताण-दाब हा त्याच्यावर रामबाण उपाय आहे. (समत्वं योग उच्चते) हळूवारपणे या प्रकारचा ताण - दाब देऊन पहा. पहिल्याच दिवशी पन्नास टक्के दुखणे कमी झालेले असेल. चूक कोणत्या आसनामध्ये झालेली आहे ते ओळखता आले नाही तर अर्थात ती दुरुस्त करता येणार नाही. चूक वारंवार पुन्हा पुन्हा होत राहिली तर त्रास वाढणार. सूर्यनमस्कार साधना खंडित होणार हे ओघाने आलेच. कोणताही शारीरिक त्रास सुरू न होता किंवा स्नायुंचे दुखणे सुरू न होता अखंडितपणे सूर्यनमस्कार साधना दररोज सुरू ठेवणे हे आपले या साधनेतील दैनंदिन उद्दिष्ट आहे. यासाठी अशा प्रश्नांना उत्तर देण्यापूर्वी प्रत्येक साधकाला प्रथम मी खालील सूचना देतो. नंतर त्यांच्या शंकेचे समाधान करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतो. पुढील प्रश्नांची उत्तरे वाचतांना प्रथम या सूचना लक्षात ठेवा व नंतर पुढचा भाग वाचा. सूर्यनमस्कार साधनेमध्ये तुम्हाला काही अडचण असल्यास या सूचनांचा निश्चित उपयोग होईल याची खात्री आहे. सूर्यनमस्कार साधना ही स्वयंसाधना आहे. तुमची चूक नक्की कोठे होते आहे हे मला समजणे अवघड आहे. तुम्ही माझ्या पासून फार दूर आहात. त्यातही तुमचा स्वभाव, दिनचर्या, वयोगट, वजन, उंची, बॉडीमास, व्यवसाय, शरीराची ठेवण, अयोग्य सवयी, व्याधी, अनुवंशिक विकार याबद्दल मला काहीही कल्पना नसतांना मार्गदर्शन करणे धाडसाचे ठरणार आहे. तरीही सूर्यनमस्कार साधनेत तुम्हाला तुमची चूक शोधण्यासाठी उपयोगी पडतील अशा काही ठळक सूचना देण्याचा प्रयत्न करतो आहे. या सूचना विचारात घेऊन सूर्यनमस्काराचा सराव करा. वैद्यकीय उपचार काही सुरू असल्यास चालू ठेवा. शरीराला विश्रांती दिल्यास व प्राणायामाचा सराव सुरू ठेवल्यास स्नायूंचे दुखणे दोन/तीन दिवसात पूर्णपणे थांबते. दुखणे न थांबल्यास उपचारासाठी वैद्यकीय मदत घ्या. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुमचा सूर्यनमस्कार साधनेतील आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल. सूर्यनमस्कार एक साधना २०८