पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साधकांचे शंकासमाधान सूर्यनमस्कार घालण्यास नुकतीच सुरुवात केली. 'कंबर' फार दुखते आहे. मार्गदर्शन करावे. या प्रकारचे प्रश्न नेहमीच विचारले जातात. अर्थात ‘कंबर’ हा अवयव प्रातिनिधिक आहे. सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने घातले नाहीत तर मान, खांदे, कोपर, मनगट, बोटे- थोडक्यात शरीरावरील चोवीस न्यासकेंद्रांपैकी- कोणतेही स्नायूकेंद्र दुखण्यास सुरूवात होते. अयोग्य पद्धतीने सूर्यनमस्कार घातल्यास स्नायुंचे दुखणे सुरू होते. या दुखण्याकडे प्रथम सकारात्मक दृष्टीकोनातून बघणे फायद्याचे आहे. योग्य पद्धतीने प्रत्येक आसन केल्यास या स्नायुंची दुखण्या- ठणकण्याची तीव्रता शून्य होते. तसेच वेदनेच्या तीव्रतेप्रमाणेच स्नायुपेशींची कार्यक्षमता दिवसभर उच्चांकावर राहते. याचा आपल्याला लगेच अनुभवही मिळतो. सातत्याने या प्रकारचा सराव दररोज केल्यास उत्साह - आनंदाचा अनुभव दिवसेंदिवस वाढत जातो. सूर्यनमस्काराच्या दीर्घ सरावातून हे सहज साध्य होते. सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात केल्यावर सुरूवातीच्या दिवसात बहुतेकांचे स्नायू दुखतात. त्यांना व्यायामाची सवय नसते. स्नायू ताठर झालेले असतात. स्नायुपेशींना काम करण्याची इच्छाही नसतो. म्हणून स्नायुंना सूर्यनमस्कारात दिलेला ताण - दाब सहन होत नाही. ते दुखतात, आपली नाराजी व्यक्त करतात. या प्रकारच्या स्नायू वेदना लगेच लक्षात येतात. ताण-दाब यामधील चूक दुरूस्त करून किंवा सूर्यनमस्कार पद्धतीमध्ये योग्य तो बदल करून हा त्रास दोन तीन दिवसात पूर्णपणे बरा होतो. व्हावयास पाहिजे. शरीरातील मेरुदंडाचे (पाठीचा कणा) एक वैशिष्ट्य आहे. अनावश्यक व चुकीचा ताण - दाब मिळाल्याने त्याच्या नैसर्गिक आकाराला धक्का पोहचतो. या प्रतिकूल परिणामाची सूचना तो ताबडतोब आपल्याला देतो. स्नायुंचे दुखणे लगेच सुरू होते. पण साधारणपणे तीन - एक दिवस त्या स्नायुंना विश्रांती दिल्यास तो मूळ स्थितीला आपोआप येतो. स्नायुचे दुखणे पूर्णपणे थांबते. दुखणाऱ्या स्नायुंना थोडी विश्रांती आणि प्राणतत्त्वाचा अधिक आहार दिल्यास मेरूदंडाचा नैसर्गिक बाक दोन / तीन दिवसात पूर्वस्थितीला येतो. दुखणे सूर्यनमस्कार एक साधना २०७