पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपस्थित असलेले माझे सर्व कुटुंबीय व संस्था पदाधिकारी व हितचिंतक / सहकारी यांचे बरोबर सर्वश्री हेमंत गोविंद अग्निहोत्री, राजेश रमेश दिमोठे, राजेंद्र गोविंदराव जोशी, सुरेश प्रभाकर देशपांडे, दत्तात्रय वसंतराव पांगारकर, विवेकानंद महादेव कुलकर्णी, श्री. रविंद्र अनंत कुलकर्णी, शामसुंदर गिरीधर जोशी, सौ. निला श्रीराम पुजारी, श्रीमती आशालता सत्यप्रसाद गोसावी, इत्यादी सूर्यनमस्कार साधक उपस्थित होते. चर्चा- सूचना मार्गदर्शन यातूनच हस्तलिखिताचे सांघिक कार्य आकार घेत होते. सौ. भाग्यश्री अभय देशपांडे, सौ. वसुमती वि. जहागिरदार, श्री. हरिभाऊ बोराटे यांनी हस्तलिखिताची अंतिम प्रत तयार करण्यात सहकार्य केले. या सर्वांचे आभार. हे सांघिक कार्य पुस्तक रुपाने आपल्या हातात देता आले ते रविकिरण एंटरप्रायझेस व सर्कल प्रेस नासिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून. हे पुस्तक देखणे करण्यामध्ये दोन्ही फर्मचे व्यावसायिक कौशल्य स्पष्ट दिसते आहेच. त्याचबरोबर पुस्तकाचे सेवामूल्य कमी करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा मुद्दाम उल्लेख करावयास हवा. व्यावसायिकांची ही सामाजिक जाणीव समाज सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना उत्साह देणारी असते. पुस्तकाचे सेवामूल्य कमी करण्यासाठी इतरांनी आर्थिक सहाय्य केलेले आहे. त्या सर्वांचे व्यक्तिशः व संस्थेतर्फे आभार मानतो. पाठीराखे, मदतनीस, सहकारी, सहभागी यांची यादी फार मोठी होईल. दररोज त्यामध्ये भरच पडते आहे. पण एवढे मात्र खरे की यातील प्रत्येकजण शक्तीउपासक, सूर्यनमस्कार साधक आहे. शक्ती उपासकांचा आदर्श आहे रामाचा दास महारुद्र हनुमान म्हणजे आपण सर्वच गुरूबंधू. गुरू सत्तेने गुरू सेवा करतो आहोत. लोक सेवा करतो आहोत. कोणी कोणाचे आभार मानायचे ? ऋण व्यक्त करायचे? या क्षणाला तुम्ही ही कार्यपुस्तिका वाचता आहात. याचाच अर्थ तुमचा सूर्यनमस्कार साधनेशी काहीतरी ऋणानुबंध आहे. तुम्ही सूर्यनमस्कार साधक आहात. साधना खंडित झाली असल्यास आजपासून उपासनेला पुन्हा सुरुवात करा. समर्थ व्हा. रामाचे दास व्हा. ह प्रेरणा आपणाला सद्गुरू रामदास स्वामींनी द्यावी अशी सर्वभावे प्रार्थना करतो. ॥जय हिंद || ॥जय महाराष्ट्र | सूर्यनमस्कार एक साधना ॥जय जय रघुवीर समर्थ ।। xxiii