पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. या सर्वांचे ऋणात राहणे मला भूषणावह वाटते. हे कृपा-ऋण वृद्धिंगत होण्यातच माझी समृद्धी आहे ही माझी श्रद्धा आहे. या दशकातील प्रत्येक दिवस माहिती व तंत्रज्ञानाचा आहे. माहितीचा विस्फोट होतो आहे. त्याचबरोबर संगणक तंत्रज्ञान विकासाचा सर्व दूरसंचार होतो आहे. माझा संगणक नेहमी 'तैयार' स्थितीमध्ये ठेवण्याची जबाबदारी मोदित एंटर प्रायझेसचे श्रीयुत सुरेंद्र देशपांडे यांनी स्वीकारलेली आहे. सामवित एंटरप्रायझेसचे श्रीयुत मनोज चव्हाणके यांनी www.suryanamaskar.info हे माझे संकेतस्थळ विकसित केले. नेटवर प्रसिद्ध केले. या दोघांच्या सहकार्यामुळे मला समजलेली सूर्यनमस्कार साधना लोकार्पण करता आली. श्री. पुनर्वसु जोशी माझे समवयस्क व शेजारी आहेत. सूर्यनमस्कार साधक आहेत. चित्रकला हा त्यांचा छंद आहे व्यक्तीचित्रण त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी प्रथम सूर्यनमस्कार-प्राणायाम प्रशिक्षण वर्ग पूर्ण केला आणि नंतर सूर्यनमस्कार आसन स्थितीच्या रेखाकृती काढून दिल्या. श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक, या संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयुत श्रीराम शांताराम पुजारी, (Retired Sr. Manager, Design, HAL Nashik) सध्या काळाराम मंदिर नासिकचे पुजाधिकारी व श्री काळाराम संस्थानचे माजी विश्वस्थ यांचे आणि संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्थ या सर्वांचा संपूर्ण कार्यामध्ये सर्वांर्थाने सहभाग असतो. देणगीदार, कार्यकर्ते, श्रोते, साधक यांचाही आधार विशेष महत्वाचा आहे. निवृत्तीनंतर मला सूर्यनमस्काराचा पूर्णवेळ कार्यकर्ता होता आले. याचे कर्तेपण माझी धर्मपत्नी सौ. सुनंदा खर्डेकर यांचेकडे जाते. सूर्यनमस्कार साधक व पत्नी या दोन्ही भूमिकेतून तिची साथ बहुमोल आहे. या पुस्तकाचे हस्तलिखित तयार होत असतांना ‘सूर्यनमस्कार ही एक प्रभावी साधना आहे' हा विचार विकसित होत गेला. नित्यनेमाने स्वत:च्या साधनेतून त्याची प्रचिती येत गेली. चर्चेतून ही संकल्पना अधिकाधिक दृढ होत गेली. या चर्चेमध्ये माझा हक्काचा श्रोता होता माझे सर्व कुटुंब - धर्मपत्नी, दोन्ही कन्या, जावई व नाती. हस्तलिखित तयार झाल्यावर प्रथम वाचन करण्यासाठी सूर्यनमस्कार एक साधना xxii