पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। जय जय रघुवीर समर्थ ॥ ।। श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड ॥ श्री रामदास स्वामींचा मठ, सज्जनगड, जि. सातारा-४१५०१३ (महाराष्ट्र) दूरध्वनी (०२१६२) २७८२२२, २७८२२२ भ्रमणध्वनी ९४२३०३४९१२ वेबसाईट : www.samartharamdas.com ट्रस्ट रजि. नं.: अ- १९५/सातारा A वन्ही तो चेतवाषा रे । चेतविताचि चेततो ॥ 4

शुभाशीर्वाद सस्नेह जयरघुवीर, श्री. सुभाष भगवंतराव खर्डेकर यांनी 'सूर्यनमस्कार एक साधना' ही कार्यपुस्तिका सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना अर्पण केलेली आहे. समर्थांच्या प्रेरणेतूनच हे लिखाण पूर्ण झाले, त्यांच्या आशीर्वादाने हे प्रसिद्ध होते आहे. हा सूर्योपासनेचा प्रसाद सर्वांना मिळावा यासाठी त्यांचा हा प्रयत्न. प्रत्येकाने सूर्यनमस्कार साधना स्वीकारावी, त्याची प्रत्यक्ष रोकडा प्रचिती घ्यावी हा त्यांचा आग्रह आहे. सूर्यनमस्कार शरीर-मन-बुद्धिचे आरोग्य अ-बाधित ठेवते. सततच्या साधनेतून ते वर्धिष्णू राहते. रोग, व्याधी, विकार, व्यसने दूर ठेवते, अकाल मृत्यू व दारिद्र्य यापासून मुक्तता मिळते इत्यादी अनेक फायदे होतात. हे सर्व लाभ मिळविण्यासाठी योग्य पद्धतीने प्रयत्न करावयास हवेत. सूर्यनमस्कार घालतांना शरीर-मन-बुद्धीचा वापर करावयास हवा. सूर्यनमस्कार वचसा - मनसा- दृष्ट्या घातला पाहिजे. या पुस्तकाचे तीन विभाग आहेत. कार्यपुस्तिका या विभागात सूर्यनमस्कार कसे घालायचे याचे सखोल मार्गदर्शन केलेले आहे. पूर्वार्धात मनाची तयारी करण्यासाठी तर उत्तरार्धात बुद्धीला समजविण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. यातून लेखकाची सूर्यनमस्काराची प्रदीर्घ साधना प्रकर्षाने जाणवते. 'संपूर्ण आरोग्याची हमी फक्त पंधरा मिनिटांमध्ये. दररोज.' हे घोषवाक्य श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नाशिक या संस्थेचे आहे. या संस्थेतर्फे या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन होत आहे. या पंधरा मिनिटांमध्ये केव्हा, कसे, किती सूर्यनमस्कार घालावे याचे मार्गदर्शन केले आहे. पुस्तिकेचा संदर्भ घेऊन सूर्यनमस्कार साधना प्रत्येकाने सुरू करावी, इतरांना शिकवावी, सूर्यनमस्कार कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तयार व्हावेत हा लेखकाचा यामागील उद्देश आहे. 'सूर्यनमस्काराचे धार्मिक अधिष्ठान (नैसर्गिक न्याय तत्त्व), ते घालण्याची शास्त्रीय पद्धत व आवश्यक असेल तेथे योग्य मार्गदर्शन सर्वांना मिळाले तर नजिकच्या काळामध्ये सूर्यनमस्कार जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचा व्यायाम प्रकार म्हणून सर्वदेश स्वीकारतील.' हा लेखकाचा ठाम विश्वास आहे. श्री. खर्डेकर काकांनी केलेल्या सूर्यनमस्कार सेवेस समर्थांनी मान्यता द्यावी, प्रभु श्रीरामचंद्रांनी लेकखाची मनोकामना पूर्ण करावी अशी मी प्रार्थना करतो. अनेक उत्तम आशीर्वाद. रथसप्तमी, ३० जानेवारी २०१२ सूर्यनमस्कार एक साधना अध्यक्ष, अधिकारी स्वामी श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड (सातारा) xxiv