पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्वार्थाने पालन करणारा 'उत्तमपुरुष' आहे. आपले अस्तित्व आदित्यनारायणावर अवलंबून आहे. आपण त्याचीच प्रतिमा आहोत. तोच आपले भरण-पोषण- धारण-संवर्धन-संचलन करणारा आहे. आदित्यनारायणाचे यच्ययावत सर्व दैवीगुण- शक्ती संपदा मानव जातीचा वारसा आहे. या आसनामध्ये हा वारसा हक्क जाणून घेण्याची पात्रता अंगी यावी व त्याचा व्यवहारात वापर करण्याची क्षमता प्राप्त व्हावी म्हणून आदित्यनारायणाला नमस्कार करावयाचा आहे. पादहस्तासन ॐ सवित्रे नमः सविता या शब्दाचा अर्थ जन्म देणारी, उत्पत्ती कारक, सर्वोत्पादक शक्ती. आपल्याला जन्म व अस्तित्व प्रदान करणारा सवितासूर्यनारायण आहे. आई ज्या प्रमाणे आपल्या लेकरांची काळजी घेते त्याप्रमाणे सवितासूर्यनारायण संपूर्ण विश्वाची काळजी घेतो. आपल्या मुलांना कशाचीही कमतरता नसावी, ते सदासर्वदा सुखी आनंदी असावेत असे प्रत्येक आईला वाटत असते. त्यासाठी ती सर्वस्व पणाला लावते. त्यांना स्वत:च्या पायावर यशस्वीपणे उभे राहता यावे म्हणून आधार देते, मदत करते. त्यांच्या सुखाची निरंतर काळजी घेते. त्यांच्या आनंदात ती सुखी असते कारण तिचे अपत्य तिच्याच शरीराचा अविभाज्य भाग असतो. आपल्या आईच्या सर्व गुणांचा निर्देश सवितासूर्यनारायणामध्ये दिसतो. जेंव्हा सविता- सूर्यनारायणाकडून आलेले संदेश, सूचना, आज्ञा याबद्दल संदेह किंवा शंका असतात त्यावेळी आईशी संपर्क साधा. ती सांगेल त्याप्रमाणे त्याच्या आज्ञा तिच्या म्हणून स्वीकारा. आपले वर्तन योग्य-अयोग्य ठरवा. आपल्या आईने या प्रसंगात कोणती कार्यप्रणाली स्वीकारली असती ते डोळ्यासमोर आणा. आपल्या वागण्यामध्ये त्याप्रकारचा योग्य तो बदल घडवून आणा. कोणत्याही संकटाला तोंड देतांना प्रथम आईच्या दृष्टीकोनातून त्याकडे पहा. तुम्हाला यशाचा मार्ग निश्चितपणे दिसेल. तुमचे प्रयत्न तुम्हाला अंतिम यशापर्यंत घेऊन जातील याची खात्री बाळगा. याप्रमाणे सवितासूर्यनारायण आपली काळजी घेतो. आईप्रमाणे आपल्या सुखाकडे लक्ष देतो. सवितासूर्यनारायणाची प्रार्थना करतांना आपल्या आईची आठवण होते. आईचे स्वप्न साकार करण्याचे सामर्थ्य व प्रेरणा सवितासूर्यनारायणाने सूर्यनमस्कार एक साधना १९२