पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. मरीचि या शब्दाचा अर्थ व्याधिविनाशक असाही आहे. महावैद्याय, विश्वाहभेषजी, व्याधिप्रणाशनाय भक्तदुःखक्षयकारक ही सूर्यनारायणाची काही विशेषणे आहेत. मला रोग-व्याधि-व्यसन यापासून मुक्ती दे. चांगलं वाईट समजण्याची बुद्धि दे. हे मागणे त्याच्या जवळ मागावयाचे आहे. त्याची प्रार्थना करावयाची आहे अश्वसंचालनासन ॐ आदित्याय नमः आदिती मातेचा आठवा पुत्र आदित्य. म्हणजेच विवस्वान. टाकून दिलेल्या अगदी मृतवत निस्तेज अंड्यातून याचा जन्म झाला म्हणून याला मार्तंड असेही म्हणतात. आदिशक्ती, आदिमाया, कुलस्वामिनी ही तिची इतर संबोधने. संध्या, गायत्री, सविता, सरस्वती, जगदंबा, कालीमाता, आंबाबाई, आई इत्यादी ही तिचीच रुपे. आदि माया ही संपूर्ण विश्वाचे मूळ स्त्रोत आहे, उत्पत्तीचे कारण आहे. आई या शब्दातील दोन अक्षर आ- आदिशक्ती आदिमाया आणि ई ईश्वर तत्त्व, परमात्मा तत्त्व यांचे निर्देशक आहे. (माई = माया + ईश्वर, माय = मूळमाया.) गर्भामध्येच आपणाला प्राणतत्त्वाचा पुरवठा आईच्या माध्यमातून मिळतो. हे प्राणतत्त्व आपल्या आईला हवेतून / वायुतून मिळते. हवेमध्ये असलेली ही चैतन्यशक्ती, वैश्विक शक्ती म्हणजेच ही आदीमाया आहे. जी शाश्वत नाही ती माया. जीवात्मा शरीर धारण करून जन्म घेतो. त्याचा कार्यभाग संपल्यावर तो शरीर सोडून निघून जातो. म्हणून सर्वजग मायावी आहे. आणि वायुतत्त्व हे त्याचे आदिरुप आहे. - आदितीचा पती बृहस्पती. बृहस्पती हा सर्व विष्णूरूप ज्ञान-विज्ञानाचा धारक संरक्षक व शिक्षक समजला जातो. हा सर्वदेवतांचा पुरोहित आहे. तो ज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे. ज्या प्रमाणे शक्ती अविनाशी आहे त्याच प्रमाणे ज्ञान अविनाशी आहे. आदित्यनारायण हा आदिती आणि बृहस्पती या स्वर्गीय मातापित्यांचा स्वर्गीय अलौकिक पुत्र. आईवडिलांचे सर्व दैवीगुण - शक्ती याचेमध्ये अंगभूत आहेत. त्यांच्याकडून मिळालेला हा गुण - शक्तीचा वारसा तो विश्वकल्याणासाठी अखंडपणे वापरतो आहे. त्यांनी शिकविलले धर्मशास्त्र, रुढी, परंपरा यांचे तो सूर्यनमस्कार एक साधना १९१