पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेजालाच प्राणशक्ती, चैतन्य असे म्हणतात. श्रीसमर्थ रामदासस्वामी याचाच उल्लेख आत्माराम म्हणून करतात. अन्न-पाणी- हवा जगण्यासाठी आवश्यक आहे पण प्राणतत्त्व / आत्माराम मात्र निर्णायक आहे. त्याशिवाय जगणे अशक्य आहे. स्थूल अन्नमय कोषाचे पोषण अन्नरसावर होते. सूक्ष्म प्राणमय कोषाचे संवर्धन प्राणायामाने होते. 'कासवाच्या पिल्लाचे भरणपोषण आईच्या वात्सल्यपूर्ण दृष्टीतून होते,' हे तुम्हाला माहीत आहे का? काही योगी पुरूष अन्न सेवन करीत नाहीत. सकाळ संध्याकाळ ठराविक वेळी उघड्यावर सूर्यप्रकाशामध्ये योगासने, प्राणायाम करतात. त्यांची दिनचर्या मात्र आपल्या सारखीच व्यस्त असते. नोकरी, उद्योग, खेळ, प्रवास हे सर्व व्यवस्थित सुरू असतात. या आसनामध्ये ऊर्जा, शक्ती, प्रकाश देणा-या सूर्यनारायणाला नमन करावयाचे आहे. आपले संरक्षण करावे म्हणून त्याची प्रार्थना करावयाची आहे. भुजंगासन ॐ हिरण्यगर्भाय नमः हिरण्य म्हणजे सोने, सोनेरी सर्वांनाच सोन्याचे आकर्षण असते. आपल्याजवळ खूप सोने असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आंतरराष्ट्रीय व्यापारात आजही चलन म्हणून सोन्याचा वापर होतो. सोन्याची अभिलाषा अमर्याद आहे. अग्निज्वाला सोने शुद्ध करतात. अग्नी हे सूर्याचेच प्रतिक आहे. सूर्यास्त व सूर्योदय यावेळी संपूर्ण विश्व सुवर्णमय होते. ह्या संधीप्रकाशातील वेळेलासुद्धा सुवर्ण मोल प्राप्त होते. संधीप्रकाशात केलेले जप-तप, अभ्यास- व्यायाम, ध्यान-धारणा इत्यादी सर्व साधनांचे अपेक्षित फल लवकर प्राप्त होते. सूर्यप्रकाशात सर्व सृष्टी दृष्य स्वरुपात येते. आपल्या डोळ्यांचे सार्थक होते. आपले सूर्यमंडल सूर्यापासूनच उत्पन्न झालेले आहे. पृथ्वीच्या गर्भामध्ये सूर्याचा गाभा आहेच. संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीला हे सूर्यतेज / प्राणतत्त्व कारणीभूत आहे. सूर्याला सुवर्णगर्भ असलेला सविता म्हटले आहे. हा सुवर्णगर्भ जसा पृथ्वीच्या केंद्रस्थानी आहे तसेच तो सर्व ग्रह - गोल-तारे यांच्याही गर्भामध्ये आहे. यामुळेच सर्व ग्रह-गोल-तारे त्यांच्या कक्षेत राहून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. सूर्यमंडलाची तसेच सर्वजीवसृष्टिची उत्पत्ती, भरण-पोषण सूर्यामुळे होते. निसर्गचक्र सूर्य, पाणी, सूर्यनमस्कार एक साधना १८९