पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐ भानवे नमः भानू या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश सूर्यप्रकाश. ज्ञानप्रकाश. अंधार अज्ञानाचे प्रतिक. प्रकाश ज्ञानाचे. सूर्यदेवता आपले अज्ञान दूर करते. यशोमार्गाकडे नेते. ज्ञानी, अनुभवी, सिद्ध बनविते. आपल्या मनातील द्वंद - करू का नको? / असे केले असते तर...? ही रस्सीखेच सतत चालू असते. या चक्रव्युहातून बाहेर पडण्याचे मार्गदर्शन आज्ञाचक्र करते. योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करते. ज्ञानसूर्याचे आपल्या शरीरातील अस्तित्व म्हणजे आज्ञाचक्र. यामुळेच आपण विचार करू शकतो. मन-बुद्धिचा वापर करू शकतो. निर्णय घेऊ शकतो. हा ज्ञानसूर्य संपूर्ण ज्ञानविश्वाचा स्त्रोत आहे. कर्मयोगाचा आदर्श वस्तुपाठ आहे. या सूयर्नारायणाचे उपासक व्हा. तुमचा प्रत्येक निर्णय सूर्यनारायणाच्या साक्षीने घ्या. त्याच्याकडून स्फूर्ती घेऊन प्रत्येक कृती करा. सूर्यनारायणाप्रमाणे इतरांच्या सदैव उपयोगी पडा. मदत केली म्हणून पारितोषिकाची अपेक्षा ठेऊ नका. नदीनाले झाडेझुडपे सूर्यनारायणाप्रमाणेच परोपकारी आहेत. कर्मयोगी आहेत. तसे पाहिले तर सर्व सृष्टी सूर्यनारायणाचे अनुकरण करीत असते. मानवाला मात्र यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. या आसनामध्ये ज्ञानसूर्याला नमन करून स्मृति बुद्धी यासाठी आशीर्वाद घ्यावयाचे आहेत. मकरासन ॐ खगाय नमः ख या शब्दाचा अर्थ आकाश. गम् म्हणजे जाणे, विहार करणे. आकाशात विहार करणारा सूर्यनारायण संपूर्ण विश्व व्यापणारा आहे. सर्व ज्ञानविश्व व्यापणारा आहे. सूर्य, सूर्यतेज, सूर्यऊर्जा अवकाशात सर्वदूर पसरलेली आहे. सूर्योदय व सूर्यास्त ही कल्पना स्थानसापेक्ष आहे. संपूर्ण पृथ्वीवर एकाच वेळी प्रातः सूर्यापासून सायंसूर्यापर्यंतची सगळी शांत - रौद्र रूपे एकाच वेळेस अवतीर्ण झालेली असतात. त्याचे प्रत्यक्ष अस्तित्व नसले तरी त्याचा अभाव पुनरागमनायच याची खात्री देणारा असतो. समुद्रामध्ये चिमूटभर जागा पाण्याशिवाय सापडणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात आणि बाहेर संपूर्ण विश्वामध्ये सूर्यतेज आहे. डोळे बंद करा. दुसऱ्या कोणाला इलेक्ट्रिक ट्युबलाईटचे बटन सुरू - बंद करावयास सांगा. तुमचे सूर्यनमस्कार एक साधना १८७