पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पदार्थ, गरम पेय घेतो. डॉक्टरकडे गेल्यास उष्णतावर्धक औषधेच मिळतात. आकाशात सूर्य उगवला, लख्ख प्रकाश पडला म्हणजे जादुची कांडी फिरविल्याप्रमाणे सर्व परिस्थिती बदलते. पाश्चात्य देशातील लोक हजारो रुपये खर्च करून सूर्यस्नान घेण्यासाठी भारतात कां येतात ते लक्षात येते. संधी काळातील प्रकाशकिरणांमध्ये अलौकिक शक्ती आहे. त्वचारोग, अस्थिरोग यामध्ये सूर्यकिरणांतील अल्ट्राव्हॉयलेट किरणांचा जादुई परिणाम होतो. हा स्पर्श मायेचा आहे. शारीरिक मानसिक व्याधी पासून मुक्ती देणारा स्पर्श आहे. आईचा नुसता स्पर्श झाला तरी रडणारे मूल तत्काल शांत होते. तसा पंचज्ञानेंन्द्रियांना ज्ञानप्रकाश देणारा हा आपला सखा आहे. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांचे नरनारायणाचे नाते आहे तेच सख्य आपले आणि सूर्यनारायणाचे आहे. या परम पावन मित्राला, आपल्या सारथ्याला पहिल्या आसनामध्ये नमस्कार करावयाचा आहे. ऊर्ध्वहस्तासन ॐ रवये नमः रवि या शब्दाचा अर्थ तेज, आभा, चमक असा आहे. संत महात्मे यांच्या चेहऱ्यावर हे तेज दिसते. पाळण्यातील लहान मुलांमध्ये हे तेज प्रकर्षाने जाणवते. त्याचा प्रभावही दांडगा असतो. तोंडाचे बोळके झालेले आजोबासुद्धा त्याच्याशी बोबड्या शब्दामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. हा प्रभाव सूर्यतेजाचा आहे. चेहऱ्यावर असे तेज असणाऱ्या साधुसंतांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून आपण त्यांना मनोभावे साष्टांग नमस्कार घालतो. चंद्र ताऱ्यांचा प्रकाश, अग्नीमधील दाहकता, यज्ञकुंडातील अग्नी ही सर्व सूर्यतेजाचीच रुपे आहेत. आपल्या शरीरातील उष्णता, अन्नाचे पचन करणारा जठराग्नी हे सूर्यनारायणाचे आपल्या शरीरातील अस्तित्व दर्शविते. एखाद्या दिवशी अपचनाचा त्रास होत असल्यास सूर्यास्तानंतर काहीच खाऊ नका. आकाशातील सूर्यतेज आणि तुमचा जठराग्नी यांच्या एकत्रित कार्यामुळे हा त्रास लगेच दुसऱ्या दिवशी दूर होईल. आपल्या शरीरातील सप्तचक्र सूर्यनारायणाचे प्रत्यक्ष प्रतिनिधीत्व करतात. हे सप्तचक्र आपल्या शारीरिक व मानसिक सर्व क्रियांचे संचलन करतात. आपल्या सर्व क्रियांना चालना देतात, ऊर्जा देतात. जर ही ऊर्जा आपल्या शरीरात नसेल तर आपण 'थंड पडू' - आपले - • सूर्यनमस्कार एक साधना १८५