पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● जादा प्राणत्त्वाचा पुरवठा होतो. मन कृतीमध्ये एकाग्र होते. प्रत्येक वेळी हा लाभ झाल्याने नाडीचे ठोके स्थिर होतात. मन शांत होते. प्रत्येक सूर्यनमस्कार अगोदर काढलेल्या सूर्यनमस्कारापेक्षा अधिक सरस काढता येतो. ● श्लोक / मंत्र येत नाही किंवा मंत्रोच्चार करण्याची इच्छा नाही अशा साधकांनी मंत्र - आशय व आसन- -कृती याची मनामध्ये थोडक्यात उजळणी करा अथवा आपल्या गुरुमंत्राचा उच्चार करा. • प्रत्येकाची सूर्यनमस्कार घालण्याची क्षमता त्याची शरीर प्रकृती, आरोग्य, वजन - उंची, व्याधी - विकार, वय, व्यवसाय, साधनेतील श्रद्धा यावर अवलंबून असते. आपल्या तब्येतीला झेपतील येवढेच सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्काराची संख्या फार संथ गतीने वाढवा. सुरूवातीला पंधरा मिनिटांमध्ये फक्त तीन सूर्यनमस्कार घाला. जसा सराव वाढेल त्याप्रमाणात, वेळ तोच पण सूर्यनमस्काराची संख्या १२+०१ येवढी वाढेल. पुढील पंधरा मिनिटांमध्ये आणखी बारा सूर्यनमस्कार घालण्याची क्षमता हळूळळू निर्माण होईल. या पंधरा मिनिटांमध्ये ४८+०१ सूर्यनमस्कार घालता येतील. यानंतर सूर्यनमस्कार घालतांना वेग-वेळ, ताल-श्वास याकडे द्या. चिंतन बारा सूर्यमंत्रांचे प्रणामासन ॐ मित्राय नमः सूर्य जगन्मित्र आहे. आपला परम मित्र आहे. जीवश्चकंठश्च मित्राप्रमाणे त्याचे आपल्यावर प्रेम आहे. तो सतत आपल्या जवळ असावा, त्याचे प्रेम, आपुलकी, मायेची ऊब आपल्याला मिळावी असे प्रत्येकाला वाटते. आकाशात सूर्य नसेल तर आपण शारीरिक व मानसिक दृष्ट्या अस्वस्थ होतो. पावसाळ्यात हा अनुभव प्रत्येकाला येतोच. ढग आपल्या डोक्यावर आणि पाऊस नाही. सगळी जीवसृष्टी जड, संथ होते. शारीरिक हालचाली मंदावतात. पचनक्रिया क्षीण होते. मायेची ऊब मिळविण्यासाठी आपण मित्रमंडळ जमा करतो. गप्पा मारतो. गरम सूर्यनमस्कार एक साधना १८४