पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्राणायामामुळे सर्वच स्नायूंची ताकद वाढते. • समंत्रक सूर्यनमस्कार ॐ कार आणि सूर्यमंत्र यांचा उच्चार करून घालावयाचा असतो. बीज मंत्रासह सूर्यनमस्कार आहेत. तृचाकल्प सूर्यनमस्कार यामध्ये ऋग्वेदातील ऋचा येतात. हंसकल्प सूर्यनमस्कार यामध्ये यजुर्वेदातील ऋचांचा समावेश आहे. मंत्रोच्चारातून नादब्रह्माचा अनुभव घेता येतो. • काही साधक प्रत्येक सूर्यनमस्कार सुरू करण्यापूर्वी गायत्री मंत्र म्हणतात. तर काही फक्त बीजाक्षराचा उच्चार करून सूर्यनमस्कार घालतात. गुरुमंत्राचा उच्चार करूनही काही साधक सूर्यनमस्कार घालत असतात. • श्रीआदित्यहृदय स्तोत्र किंवा श्रीसूर्यसहस्त्रनाम यांचाही उपयोग सूर्यमंत्रासारखा केला जातो. ● सूर्यनमस्काराचे एक आवर्तन चोवीस सूर्यनमस्काराचे असते. (संदर्भ: उत्तरार्ध, शंका समाधान) सूर्यनमस्कार देवी गायत्रीची / आदिशक्तीची / आदिमातेची उपासना आहे. गायत्रीमंत्रातील शब्द चोवीस, दिवसाचे तास चोवीस, शरीरावरील न्यासस्थाने चोवीस, वेदान्त व गीता तत्त्वज्ञाना प्रमाणे विश्वातील मूलतत्त्वे चोवीस (अधिक एक परमात्मा ). म्हणूनच बारा सूर्यनमस्काराचे अर्धे आवर्तन १२+०१ असते. 0 सूर्यनमस्काराचे एक आवर्तन २४+०१ असे असते. • जर दोनपेक्षा अधिक सूर्यनमस्कार आवर्तने (१२+०१) घालावयाची असतील तर पहिल्या आवर्तनानंतर एक सूर्यमंत्र एक संपूर्ण सूर्यनमस्कार (बारा शरीर स्थिती असलेला) अशी घालावीत. • शेवटचे आवर्तन मात्र क्रमाने दोन-चार - बारा बीजमंत्र व सूर्यमंत्र यांचा उच्चार करून घालावे. • तिसरे आवर्तन या पद्धतीमध्ये मनाची एकाग्रता, सावकाश- खोल - दमदार श्वसन आणि सर्व शारीरिक व मानसिक क्षमतेचा वापर या तीनही गोष्टी साध्य होतात. मंत्रोच्चारामुळे दोन सूर्यनमस्कारामध्ये स्नायूंना आवश्यक असलेली विश्रांती व सूर्यनमस्कार एक साधना १८३