पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐ हैं सवित्रे नमः ॐ ह्रौं अर्काय नमः ॐ ह्ः भास्कराय नमः • बारा सूर्यनमस्कारांचे तिसरे आवर्तन घालतांना ॐ कार, बीजमंत्र, सूर्यमंत्र यांच्या उच्चाराचा क्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे. क्रमाने दोन-चार - बारा बीजमंत्र व सूर्यमंत्र यांचा उच्चार करून पुढील गटाचा उच्चार करावयाचे आहे. +०१ समर्पणाचा सूर्यनमस्कार श्रीसवितासूर्यनारायणायनमः हा मंत्र म्हणून घालायचा आहे. जसे- ● ● ॐ + ०२ बीजमंत्र + ०२ सूर्यमंत्र सूर्यनमस्कार ०६ घालावेत. ॐ + ०४ बीजमंत्र + ०४ सूर्यमंत्र सूर्यनमस्कार ०३ घालावेत. ॐ + १२ बीजमंत्र + १२ सूर्यमंत्र सूर्यनमस्कार ०३ घालावेत. ॐ + १२ बीजमंत्र + श्रीसवितासूर्यनारायणायनमः ०१ सूर्यनमस्कार घालावा. सूचना : • प्रत्येक मंत्राचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव शरीर-मन- प्राणचैतन्य यावर होतो हे लक्षात ठेवा. • प्रत्येक मंत्राचा उच्चार दीर्घ करा. मंत्रोच्चार करतांना 'सप्तपथ' स्थानाकडे लक्ष द्या. मंत्राचा अर्थ-भाव याची उजळणी करा. मंत्रोच्चारीत प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा. सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक आसनातील प्रत्येक कृती करतांना मन एकाग्र करा. ● सूर्यमंत्र दीर्घ स्वरात मोठ्याने म्हणा. वापरलेले सर्व प्राणतत्त्व छाती-पोट- ओटीपोट यातून संपूर्णपणे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या प्रमाणात हे वापरलेले प्राणतत्त्व बाहेर काढाल त्यापेक्षा अधिक प्रमाणात प्राणतत्त्व आत घेतले जाणार आहे. • मंत्रोच्चार करतांना श्रम करणाऱ्या स्नायूंना विश्रांती मिळते. मंत्रोच्चारीत सूर्यनमस्कार एक साधना १८२