पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व वायूनलिका यावर होतो. याच्या परिणामामुळे हा सर्व भाग स्वच्छ, मऊ व ओला राहतो. त्याची कार्यक्षमता वाढते. ०५) विसर्ग: विसर्गाचे उच्चारस्थान हृदय आहे. याचा उच्चार केल्यावर जी सूक्ष्म कंपने तयार होतात त्याचा प्रभाव छाती व श्वसन मार्ग यावर होतो. परिणामस्वरूप श्वासोच्छ्वास दीर्घ व खोल होतो. प्रणव बीजमंत्र सूर्यमंत्र उच्चारण्याचा क्रम : • ॐ कार आणि सूर्यमंत्र मोठ्याने म्हणून बारा सूर्यनमस्काराचे प्रथम आवर्तन घालतात. प्रत्येक सूर्यमंत्र म्हणतांना त्याचा अर्थ त्या आसनाची योग्य कृती, त्याचा लगेच जाणवणारा परिणाम याकडे संपूर्ण लक्ष द्यायचे आहे. एक सूर्यमंत्र एक शरीर स्थिती असे बारा सूर्यमंत्र व बारा आसनस्थिती मिळून एक सूर्यनमस्कार होतो. O बारासूर्यनमस्काराचे दुसरे आवर्तन बीजमंत्र व सूर्यमंत्र यांचा उच्चार करून घालतात. प्रत्येक मंत्र म्हटल्यावर संपूर्ण सूर्यनमस्कार घालावयाचा आहे. ॐकार आणि सूर्यमंत्र यामध्ये बीजमंत्राचा उच्चार करावयाचा आहे. +०१ समर्पणाचा सूर्यनमस्कार श्रीसवितासूर्यनारायणायनमः हा मंत्र म्हणून घालायचा आहे. ॐ ह्रां मित्राय नमः ॐ ह्रीँ रवये नमः ॐ हूं सूर्याय नमः ॐ हैं भानवे नमः ॐ ह्रौं खगाय नमः ॐ ह्ः पूष्णे नमः ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः ॐ ह्रीं मरीचये नमः ॐ हूं आदित्याय नमः सूर्यनमस्कार एक साधना १८१