पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यबीज आहे. याला महाप्राण असेही म्हणतात. या बीजाक्षराचे उच्चारस्थान हृदय आहे. उच्चारातील ध्वनी स्पंदनामुळे हृदयाला मसाज होतो. हृदयाला जादा ऊर्जा मिळाल्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. ०२) रया वर्णाचे अधिष्ठान अग्नी आहे. याला अग्नीबीज म्हणतात. या बीजाक्षराचे उच्चारस्थान ललाट मध्य आहे. उच्चारातील ध्वनी स्पंदनामुळे टाळू अणि मेंदुला मसाज होतो. यामुळे स्वरयंत्र व बुद्धी तीक्ष्ण होते. जीभेचा उपयोग, बोलण्यासाठी व खाण्यासाठी, संयमित स्वरूपात होतो. ०३) स्वर स्वर म्हणजे स्वरयंत्रामध्ये किमान स्पंदनाने निर्माण झालेला नाद. ही स्पंदने शरीरावर परिणाम करणारी असतात. मोठ्या आवाजातील ढोल, ताशे, शंख, भैरी या रणवाद्यांमुळे पोटात धडकी, कानात दडे बसतात. कमीतकमी ध्वनीस्पंदनाने निर्माण झालेले तरंग शरीरातील त्या त्या भागात अधिक प्रभावी व परिणामकारक सिद्ध होतात. दीर्घ ऊ या स्वराचा उच्चार केल्यावर जी सूक्ष्म कंपने तयार होतात त्याचा प्रभाव यकृत, प्लीहा, जठर, छोटे आतडे, सर्वपाचक स्त्राव यावर होतो. याच्या परिणामामुळे पचनशक्ती सुधारते. दीर्घ ई या स्वराचा उच्चार केल्यावर जी सूक्ष्म कंपने तयार होतात त्याचा प्रभाव स्वरयंत्र, टाळू व नासिकामार्ग यावर होतो. या मार्गातील चिकट, विजातीय द्रव दूर होतो. हा सर्वमार्ग मऊ स्वच्छ होतो. परिणामस्वरूप स्वरयंत्राची कार्यक्षमता वाढते. हैं या बीजाक्षर मंत्रातील संयुक्त स्वराचा उच्चार केल्यावर जी सूक्ष्म कंपने तयार होतात त्याचा प्रभाव किडनी व मूत्र मार्ग यावर होतो. याच्या परिणामामुळे किडनी व मूत्र मार्ग अधिक कार्यक्षम होतात. ह्रौं या बीजाक्षर मंत्रातील संयुक्त स्वराचा उच्चार केल्यावर जी सूक्ष्म कंपने तयार होतात त्याचा प्रभाव मोठ्या आतड्यावर होतो. कोठा साफ होऊन, मलमार्ग स्वच्छ व कार्यक्षम होतो. ०४) अनुनासिक : अनुनासिक उच्चार म्हणजे नाकातून केलेला उच्चार. अनुनासिकाचा उच्चार केल्यावर जी सूक्ष्म कंपने तयार होतात त्याचा प्रभाव नाक सूर्यनमस्कार एक साधना १८०