पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मात्रांमध्ये (विभागात) केला जातो. प्रत्येक मात्रेचा उच्चार लांबविणे, अधिक लांबविणे, अधिकतम लांबविणे असा केला जातो. (अअअअ उउउउउउउउ ………………………………म्) तिसऱ्या मात्रेचा उच्चार करतांना ओठ बंद असतात. ॐ काराच्या तीन मात्रांच्या उच्चारातून अनुक्रमे पोट, हृदय व मेंदू कार्यरत होतात. रुग्णांचे सर्वसाधारण प्रकार तीन आहेत. पोटाचे विकार असलेले, फुप्फुसाचे विकार असलेले, मेदूचे विकार असलेले रुग्ण अ+उ+म या तीन मात्रांची ध्वनीकंपने क्रमाने मणिपूरचक्र, अनाहतचक्र, आज्ञाचक्र या भागावर आदळतात. या ऊर्जाचर्कांच्या अधिकारात असलेल्या अवयवांमध्ये ही स्पंदने संक्रमित होतात. यामुळे पचनक्रिया, रक्ताभिसरण व मज्जारज्जूतील संदेश वहन अधिक सक्षम होते. शरीर-श्वसन-बुद्धी यांना ग्रासणारे सर्वरोग दूर राहतात. बुद्धीची एकाग्रता व स्मरणशक्तीची तीव्रता वाढते. मंत्र उच्चारामुळे सूक्ष्म कंपने तयार होतात. या कंपनामुळे घशात असलेल्या ‘सप्तपथ' स्थानाला मसाज होतो. घशात एकूण सात मार्ग एकत्र झालेले आहेत. दोन नाकपुड्यांचा श्वसन मार्ग, दोन कानांचा श्रवण मार्ग, अन्नलिका, श्वासनलिका आणि तोंड. या सर्व कार्यसंस्थांवर या ध्वनी कंपनांचा चांगला प्रभाव पडतो व त्या पूर्वीपेक्षा अधिक कार्यरत होतात. बीजाक्षरमंत्र प्रणव उच्चारा प्रमाणेच प्रत्येक बीजाक्षरांचा उच्चार प्रत्येक वेळी करतांना तो कसा करायचा, कोठून करायचा, कशासाठी करायचा या तीन प्रकारांकडे लक्ष द्यायचे आहे. बीजाक्षरमंत्र सहा आहेत. या सहा बीजाक्षरमंत्रांची क्रमश: दोन आवर्तने करून (सहा+सहा) सूर्यमंत्राचे अगोदर प्रत्येक बीजमंत्राचा उच्चार केला जातो. बीजाक्षरांचा उच्चार नेहमी दीर्घ करतात. हे बीजमंत्र पुढील प्रकारचे आहेत. ॐ ह्रां ह्रीं हूं हैं ह्रौं ह्ः किंवा ते असेही लिहितात. हां / न्हीं / हूं / हैं। ह / हः प्रत्येक बीजमंत्राचा उच्चार ॐ कार आणि सूर्यमंत्र यांच्यामधे केला जातो. जसे ॐ ह्रां मित्राय नमः बीजाक्षरमंत्रामधील वर्ण व त्यांचा क्रम आणि इतर माहिती खालील प्रमाणे. ०१) ह या वर्णाचे अधिष्ठान आकाशतत्त्व हे सूक्ष्म स्वरुपातील सूर्यतेज किंवा सूर्यनमस्कार एक साधना १७०