पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येतात अशी ही सिद्ध साधना आहे. यामुळे अकाली मृत्यू व दारिद्र्य यातून मुक्ती मिळते. डोळ्यांचे सर्वविकार दूर राहतात. दीर्घआयुष्य, बुद्धी, प्रज्ञा, पराक्रम, कीर्ती तेज याची प्राप्ती होते. हा सिद्धांत प्राचिन ऋषीमुनिंनी मांडलेला आहे. तो स्वयंसिद्ध आहे. त्याची प्रचिती आपणास येत नसल्यास आपले प्रयत्न अपूर्ण आहेत याची जाणिव ठेवा. प्रयत्नामध्ये योग्य तो बदल करा. श्रद्धेने आत्मविश्वासाने प्रयत्न करा. अखंडितपणे प्रयत्न करा. ज्या प्रमाणात तुम्ही प्रयत्न कराल त्या प्रमाणात तुम्हाला यश मिळणारच याची खात्री बाळगा. आदित्यनारायण तुम्हाला सूर्यनमस्काराची उदंड प्रेरणा देतो सूर्यनमस्कार घालण्याचे शारीरिक सामर्थ्य देतो, तुमच्याकडून सूर्यनमस्कार काढून घेतो. सूर्यनारायणाने आपल्याकडून घालून घेतलेले सूर्यनमस्कार त्याचे त्याला अर्पण करा. नमः प्रत्यक्ष देवाय भास्कराय नमोनमः ॥ ।। श्रीरामसमर्थ ।। समंत्रक सूर्यनमस्कार प्रणव आणि बीजाक्षरमंत्र ॐ कार म्हणजेच प्रणव उच्चार मंत्र शास्त्रामध्ये ॐ कार हा प्रथम क्रमांकाचा मंत्र आहे. हा विश्वातील प्रथम नाद आहे. नादातून ब्रह्माची उत्पत्ती म्हणून नादब्रह्म आहे. दुसरा क्रमांक आहे सूर्योपासनेतील गायत्री मंत्राचा (सूर्यमंत्राचा). ॐ कार साधनेतून रोग-व्याधी विकार नष्ट होतात. तसेच गायत्री मंत्राचे सर्व फायदे मिळतात. बीजाक्षरमंत्र, सूर्यमंत्र, सूर्यनमस्कार हे सर्व प्रकार एकमेकांस पूरक आहेत. यातील प्रत्येक मंत्राचा उच्चार इतर मंत्रांचा प्रभाव व परिणाम वृद्धिंगत करणारे आहे. प्राणायामाचे मूलतत्व या मंत्रउच्चारात आहे. विशिष्ट रोगावर इलाज करण्यासाठी सूर्यनमस्काराला पूरक असलेले प्राणायाम उपचारात वापरले जातात. प्राणायामाच्या सरावातून अधिक प्रमाणात प्राणतत्त्व स्वीकारण्याची सवय शरीरास लागते. प्राणतत्त्वाच्या माध्यमातूनच सगळे रोग बरे होतात, सगळे रोग ठेवता येतात. बीजाक्षर मंत्राच्या अगोदर प्रणव उच्चार करतात. ॐ काराचा उच्चार तीन सूर्यनमस्कार एक साधना ● १७८