पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• पुढील दिवशी करण्यासाठी तुमच्या आवडीची व आवश्यक अशी तीन कामे, प्रत्येकी तीस मिनिटांची निवडा. • आजची नियोजित तीन कामे ठरविल्याप्रमाणे पार पडली कां ? नसल्यास उद्या पुन्हा प्रयत्न करण्याचा निश्चय करा. ● पूर्ण झाली असल्यास कामाचे स्वरूप व व्याप्ती यामध्ये वाढ करा- काम सुरुवात करण्याची निश्चित वेळ, त्यास लागणारा एकूण वेळ, आजचे त्या कार्यातील उद्दिष्ट, कार्याची पद्धत, त्याचे काठिण्य इत्यादीमध्ये वाढ करा. • दररोज दोन ओळी सहज पाठ होतात. आता हळूहळू त्यामध्ये वाढ करा - एखादे कडवे, अवघड व्याख्या, पदार्थाचे गुणधर्म, सुविचार, दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक, जवळचे मित्र व नातेवाईक यांच्या जन्म तारखा इत्यादी. या अगोदर झालेल्या पाठांतराची उजळणी करा. स्मरणशक्तीची व्याप्ती व खोली वाढविण्याचा प्रयत्न करा. .... • या स्मरणशक्तीचा उपयोग अभ्यासात तसेच दररोजचे व्यवहार संभाषण यामध्ये करा. • आज संपर्कामध्ये आलेल्या व्यक्ती कोण होत्या, त्यांच्याशी झालेले संभाषण, त्यांचे प्रस्ताव, सूचना, सल्ले, तसेच इतर प्रसंग यांची उजळणी करा. यामध्येच आपल्या उत्कर्षासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन आहे हे लक्षात ठेवा. याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघा. आपल्या उन्नतीसाठी जे जे चांगले असेल ते ते स्वीकारा. • सर्वशरीर सैल सोडा. स्नायूंवर कोठे ताण असल्यास तो दूर करा. डोळे बंद करून, डोक्यापासून पायापर्यंत शरीर हळूहळू, क्रमशः, टप्याटप्याने, शिथील करा. बंद डोळ्याने श्वासोश्वासाकडे लक्ष द्या. परमेश्वराने सोपविलेले काम उद्या अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून आदित्यनारायणाची प्रार्थना करा. आज केलेले पाठांतर किंवा जपसाधना / प्रार्थना करत करत स्वतःला झोपेच्या स्वाधीन करा. वेदपूर्व कालापासून आपण सूर्योपासना / सूर्यनमस्कार करत आलो आहे. सूर्यनमस्काराच्या सरावातून सर्वप्रकारचे शारीरिक व मानसिक रोग दूर ठेवता सूर्यनमस्कार एक साधना १७७