पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाठ करा. • पाठांतर लिहून करा. अक्षर सुवाच्च व लेखन शुद्ध याकडे लक्ष द्या. • दररोज सकाळच्या वेळेत लिखाण वाचन झालेच पाहिजे हा नियम करा. सूर्यनमस्कार घातल्यानंतर न्याहारी घेण्यासाठी वीसएक मिनिटे थांबा. किंवा पूजा-अर्चा वगैरे झाल्यावर न्याहारी करा. ( शरीरातील सर्वच पेशिंना ताण / दाब मिळालेला आहे. तो ताण पूर्ण शांत होऊ द्या. योगनिद्रेचा वापर केल्यास हा वेळ निम्म्याने कमी करता येईल.) • ● काहीतरी खाणे झाल्यानंतरच नित्यक्रम, शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय, उद्योग वगैरे करण्यासाठी घराबाहेर पडा. • व्यायाम-पूजा-खाणे हे झाल्याशिवाय कोणत्याही कामाला सुरूवात करू नका. नुसते चहा घेऊन कामाला लागू नका. (चहाची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा ) • सायंकाळची वेळ मैदानी खेळ, सूर्यदर्शन इत्यादीसाठी राखून ठेवा. • यानंतरचा वेळ घरामध्ये करमणूक, बैठेखेळ, गप्पाटप्पा, टीव्ही, लेखन, वाचन, आवृत्ती अभ्यास इत्यादीसाठी उपयोगात आणा. • रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान दोन तास अगोदर घ्या. • जेवणानंतर किमान एकतास अभ्यास, वाचन, आवृत्तीसाठी राखून ठेवा. • गादीवर पडल्यावर झोप येण्यापूर्वी दिवसभराच्या कामाचा आढावा घ्या. ● हा आढावा घेतांना माझी चूक झाली. मी असे वागावयास, बोलावयास, विचार करावयास नको होते असे जेथे वाटेल तेथे थांबा. • झालेली चूक सुधारण्याचा निश्चय करा. दुसऱ्या दिवशी संबंधित व्यक्तीची माफी मागा. माझी चूक झाली म्हणून कबूल करून टाका. • आपल्या चुकीच्या वागण्यामुळे मन अस्वस्थ होते. रात्रीच्या शांत झोपेत त्यामुळे व्यत्यय येतो. त्याचा परिणाम शरीरावर होतो. सूर्यदर्शन, सूर्यनमस्कार, जप, ध्यान, पूजा, अभ्यास यामध्ये सुद्धा हे अस्वस्थ मन अडथळा आणते. सूर्यनमस्कार एक साधना १७६