पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• शरीराला आलेला लठ्ठपणा किंवा वाढलेले अनावश्यक वजन याचा संबंध व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार, विरुद्ध अन्न याचाशी आहे. शरीरप्रकृतीला न मानवणारे अन्न पुन्ह:पुन्हा खाल्यामुळे अपचन होते. त्यातून बद्धकोष्ट सुरू होतो. ● कुरकुरे चिवडे, चहा, कॉफी, थंड पेये ठेवा. • मानसिक काळजी, चिंता दूर ठेवा. मन शांत ठेवा. आठवड्यातून एकदा / महिन्यातून एकदा सौम्य रेचक आवश्य घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने रेचक कोणते घ्यावयाचे ते ठरवा. बाजरी, नागली, कुळिथ इत्यादी पीठ वापरून पातळ पेज, घट्ट लापशी झटपट 'दोन मिनिटात' करता येते. ● ● तुमच्या दररोजच्या आहारातील गोड, पचनाला जड, तेलकट-तूपकट तळलेले पदार्थ, दुधाचे पदार्थ, पक्वान्न मर्यादित ठेवा. • पचनाला जड असलेले पदार्थ अंगी लागण्यासाठी / त्यांचे सपूर्ण पचन होण्यासाठी सूर्यनमस्काराची संख्या वाढवा. • आपल्या शरीराला अयोग्य असणारे अन्नपदार्थ लक्षात येण्यासाठी नेहमी दक्ष रहा. प्रयोग करून ते अन्नघटक निश्चित करा. त्याप्रमाणे सवयी बदला. • आपण घेत असलेल्या अन्नाचा चांगला-वाईट परिणाम पुढील पिढ्यांवरही होत असतो हे लक्षात ठेवा. 'हितभुक मितभुक' राहण्याची स्वतःला सवय लावा. दिनक्रम मार्गदर्शक सूचना- • जाग आल्यानंतर लगेच अंथरूणातून बाहेर पडा. महाबली प्राणदाता, सकळा उठवी बळे। मारुतीरायाचे, विष्णू व विष्णूपत्नीचे स्मरण करा. आज मिळालेला दिवस अधिक यशदाशी व्हावा म्हणून त्यांचे आशीर्वाद घ्या. • आंघोळीनंतरचा वेळ सूर्यदर्शन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, संध्याविधी, जप- तप- पूजा-ध्यान म्हणजेच अभ्यास यासाठी वापरा. • सकाळच्या वेळेत बुद्धी - स्मरणशक्ती तीव्र असते. दररोज किमान दोन ओळी सूर्यनमस्कार एक साधना १७५