पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• गायीचे ताजे लोणी व मध सकाळी दात घासल्यानंतर घेणे हितकारक आहे. • शिजवलेल्या अन्नाबरोबर कच्चे अन्न घ्या. त्याचे प्रमाण एकास एक ठेवा. • कच्चे अन्न, नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध असणारे अन्न- भिजवलेले मोड आलेले कच्चे मठ, मूग, चवळी, हरबरा, तूर इत्यादी. कोबी, फ्लॉवर, गाजर, बीट, टमाटा, मुळा, कांदा, काकडी, कच्चे पालक, सॅलड, मटार- यांचा उपयोग जेवणात करा. ● भुईमुगाच्या शेंगा, ओले हरबरे, मक्याचे कणीस, बोरं, चिंचा, आवळे जांभूळ, करवंद, केळी, पपई, पेरु, सीताफळ, रामफळ, आंबा, द्राक्ष, संत्र, मोसंबी, डाळिंब इत्यादी त्या त्या ऋतूमध्ये मिळणारी स्वस्त फळे आवर्जून खा. • योग्य ती प्रक्रिया करून हवाबंद फळ- रसापेक्षा त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध होणारी फळे अधिक चांगली. • फळांमध्ये सुकामेवा मुखशुद्धी म्हणून थोडा खाण्यास हरकत नाही. ● दूध व फळ एकत्र खाऊ नका. फळ खाल्यानंतर दोन तासांनी दूध घ्या. आंबा व दूध हा फक्त याला अपवाद आहे. • दही उष्णता वर्धक आहे. ते उन्हाळ्यात, रात्री, गरम पदार्थांबरोबर खाऊ नका. मात्र ताज्या दह्याचे ताक अमृतासमान आहे. 'तक्रं शक्रस्य दुर्लभम्' ● शिळे, आंबलेले किंवा आंबविलेले पदार्थ खाल्याने थोडा जरी त्रास होत असल्यास हे पदार्थ आहारातून वजा करा. • जेवणामध्ये फळभाज्या, पालेभाज्या, मोडआलेले व्दिदल धान्य यांचा वापर करा. • जेवणामध्ये दुधाचे गोड पदार्थ अधूनमधून कधीतरी असावेत. • साखरेचा वापर कमितकमी करा. मध, खांडसरी साखर, गूळ, उसाचा रस, खजूर इत्यादिंचा वापर जास्तितजास्त करा. • तयार अन्न, हवाबंद अन्न, चिवडे, कुरकुरीत पदार्थ, थंड पेय, उत्तेजक पेय, यांचा वापर कमी करून पेज - लापशी-खीर आणि फळे यांचा वापर वाढवा. सूर्यनमस्कार एक साधना १७४