पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• जेवणानंतर आईस्क्रीम, थंड पदार्थ घेऊ नका. याउलट जेवणानंतर गरम पाणी घ्या. गरम पाण्याने पचन चांगले होते. • दोन्ही बाजूकडील दाढांनी अन्न चावून, तोंडात घोळून, चव घेत जेवण करा. • पाणी द्रव पदार्थ तोंडात घोळून चव घेत सावकाश गिळा. • शाकाहारी, गरम, शिजवलेले, ताजे अन्न ही मोजपट्टी प्रत्येक पदार्थाला लावा. • उन्हाळ्यात जड अन्न, तिखट, आंबट, उष्ण पदार्थ, थंडपेये टाळा. दुपारची थोडी वामकुक्षी घेण्यास हरकत नाही. • पावसाळ्यात जठराग्नी जास्तच मंदावतो. भूक कमी लागते. रेचक वगैरे घेऊन कोठा साफ ठेवा. भूक वाढविणारे, पाचक पदार्थ यांचा आहारामध्ये समावेश करा. उकळलेले पाणी, भाजलेले अन्न पावसाळ्यात घेणे हितावह आहे. मेथ्या, कारली, लिंबाची साल, ताजे ताक, कवठ, आवळे, उंबरे, खारका यांचा वापर पावसाळ्यात जरूर करा. दुपारची झोप टाळा, रात्री जागरण करू नका. हिवाळा हा आरोग्य व बल वर्धन करणारा ऋतु आहे. भूक वाढलेली असते. सकाळी लवकर भूक लागते. न्याहारी भरपेट करा. दुपारचे जेवण यथेच्छ घ्या. रात्री मात्र मित आहार ठेवा. रात्रीचे जागरण करू नका. तळलेले, तुपाचे, मिष्टांन्न, दुधातुपाचे पदार्थ, सुकामेवा सर्वच पदार्थ अंगी लागतात. त्याचबरोबरच भरपूर व्यायाम, अंगाला तेल लाऊन गरम पाण्याने स्नान, सकाळचे सूर्यस्नान यांचाही पुरेपूर उपयोग याच ऋतुमध्ये करून घ्या. ● तळलेले पदार्थ जास्त खाऊ नका. ● • बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ संपूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करा. • तळलेले पदार्थ, खावयाचे झाल्यास, ते थोड्या प्रमाणात, जेवणामध्ये सुरुवातीला घ्या. • बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर त्याच्या दुप्पट आकारमानाचे गरम पाणी किंवा एक ग्लास फळाचा रस घ्या. • गायीचे ताजे दूध, दही, ताक, लोणी, तूप याचा यथायोग्य वापर जेवणामध्ये आवश्य करा. सूर्यनमस्कार एक साधना १७३