पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाही. शरीरातील सर्व पेशी कार्यरत झाल्यामुळे तुम्ही जे काही खाता त्यातील संपूर्ण अन्नरस शोषला जातो. त्याचा वापर शरीरशुद्धी व शरीरवृद्धी यासाठी केला जातो. रोगनिवारणासाठी सूर्यनमस्कार, प्राणायाम, आहार व औषध या सर्वांना सारखेच महत्त्व आहे. प्रत्येक घटक एकमेकांना पूरक आहे. संघटितपणे यांचे कार्य सुरू झाल्यास रोग निवारण हमखास होतेच. आहारासंबंधीच्या खालील सर्वसाधारण सूचनांचे पालन केल्यास खाण्याच्या चांगल्या सवयी लागतील. अर्थात जुन्या सवयी लगेच जात नाहीत. त्यासाठी सातत्याने जाणिवपूर्वक प्रयत्न करावयास हवेत. अयोग्य आहार म्हणजे शरीराला न मानवणारे अन्न. आदल्या दिवशीचा आहार योग्य होता किंवा नाही याच्या सूचना सकाळी पोट साफ होतांना मिळतात. त्या सूचनांकडे लक्ष द्या. अयोग्य आहार संपूर्णपणे टाळा किंवा तो कमीतकमी घ्या. योग्य, उपयुक्त, सात्विक आहार सदासर्वकाळ घ्या. शाकाहार कां मांसाहार या दोन्हीमध्ये निवड करावयाची असल्यास शाकाहारास प्राधान्य द्या. • जेवणाची ठराविक वेळ निश्चित करा. त्या वेळेसच दररोज जेवा. वेळ टाळू नका. • भूक लागली नसल्यास जेवण टाळा. लंघन करण्याची ही निसर्गाची सूचना आहे. आठवड्यातून/पंधरा दिवसातून एकदा उपवास करा. • उपवासाचे दिवशी, आवश्यक असल्यास, द्रव पदार्थ किंवा फळे खा. • रविवारी मिठाचा वापर न करता स्वयंपाक करा. गोड, तळलेले, दुधा-तुपाचे पदार्थ खाऊ नका. तेरा रविवार या पध्दतीने उपवास करा. दृश्य स्वरुपात याचे फायदे लक्षात आल्यास ते चालू ठेवा. • • सायंकाळचे खाणे सूर्यास्तापूर्वी. ही आदर्श वेळ. रात्री झोपण्यापूर्वी किमान दोन तास अगोदर सायंकाळचे जेवण घ्या. • गप्पामारत, हसत-खेळत, आनंदाने, अन्नाची चव घेत, शांतपणे जेवण करा. टीव्ही समोर बसून जेवण करू नका. • अन्न उभ्याने खाऊ नका. पाणी उभे राहून पिऊ नका. सूर्यनमस्कार एक साधना ● १७२