पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बुद्धी व स्मरणशक्ती यांमध्ये आश्चर्यकारक प्रगती होते. आहारासंबंधी मार्गदर्शक सूचना- शरीरासाठी अन्न हे परमब्रह्म आहे. या अन्नमय कोशाचे अस्तित्व अन्नावर अवलंबून आहे. आपण जे खातो-पितो तसे वागतो-बोलतो. शरीराला ऊर्जा देणारा एकमेव स्त्रोत, प्राणशक्ती व्यतिरिक्त, फक्त अन्न आणि अन्नरस आहेत. या अन्नातील ऊर्जेमुळे आरोग्य व मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते. अन्नातील औषधी तत्त्वांमुळे सर्वप्रकारचे रोग-व्याधी बरे होतात. त्याचप्रमाणे अयोग्य आहार हा सर्व रोगांचे मूळ उगमस्थान आहे. पोट हेच व्याधी - विकारांचे अभयस्थान आहे. या पोटाचा गैरउपयोग कमी करायचा म्हणजे काय खायचे, किती खायचे, व केंव्हा - कसे खायचे याचा प्रामुख्याने विचार करणे होय. आपला देह पंचकोशात्मक आहे. दृश्य देहास अन्नमय कोश असे म्हणतात. अन्नाचा दृष्य परिणाम स्थूल अशा अन्नमय कोशावर होतो. तसेच तो प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश व आनंदमय कोश यावरही होतो. म्हणूनच ‘अन्नात भवन्ति भूतानि' असे म्हटले जाते. आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे. ते निरोगी व स्वस्थ ठेवण्यासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचे नैसर्गिक सहाय्य घेणे आवश्यक आहे. आपल्या शरीराचे उष्णतामान साधारणपणे ९८% फॅ. नेहमी असते. श्वसनप्रक्रिया व पचनक्रिया यातून ऊर्जा तयार होते. अन्नामुळे मिळणा-या ऊर्जेतूनच वरील क्रिया आपणास करता येतात. अन्नामुळेच शरीराची झीज भरून निघते. शरीराची योग्य वाढ होते. व्यायाम केल्यामुळे किंवा सूर्यनमस्कार घातल्याने शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र चुकीच्या पद्धतीने किंवा क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम केल्यास त्रास होतो. तसेच भरमसाठ खाणे, विरुद्ध आहार घेणे यामुळे व्यायामाचा इष्ट परिणाम होत नाही, दुष्ट परिणाम मात्र लगेच अनुभवास येतात. बद्धकोष्ट हा त्यातील प्रमुख विकार आहे. या विकारातूनच अनेक रोग, व्याधी, व्यसने सुरू होतात. सूर्यनमस्कार घालण्यासाठी खुराक किंवा विशिष्ट आहाराची आवश्यकता सूर्यनमस्कार एक साधना १७१