पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हे प्रभो सूर्यनारायणा, या (ब्रह्मांडरूपी) सुवर्ण कलशामधील सत्यधर्मतत्त्व तू अच्छादून टाकले आहेस. (तुझ्या ज्ञानप्रकाश किरणांच्या बोधामृतातून ) या अच्छादना पलीकडे असलेल्या शाश्वत धर्मतत्त्वाची दृष्टी मला प्रदान कर. सूर्याच्या दिव्य तेजाने सर्व अंग पुलकित होत आहे याकडे लक्ष द्या. • डोळ्यांवर होणारा सूर्यतेजाचा परिणाम अनुभवा. • शरीर-मन-बुद्धी यावर होणारा सूर्यतेजाचा परिणाम अनुभवा. सूर्यनारायणाला नमस्कार करा. डोळे उघडा. सावलीकडे किंवा हिरव्या झाडाकडे ● ● बघा. • आपल्या उद्योगाला लागा. ही संपूर्ण क्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणपणे दीड ते दोन मिनिटे लागतात. वेळेच्या अभावी सूर्यदर्शन घेण्याची दुसरी पद्धतसुद्धा हातातून निसटली. आणखी तिसरा प्रयत्न करण्यास हरकत नाही. रात्री झोपण्यापूर्वी देवाला आपण नमस्कार करतो. त्यावेळी ही पद्धत वापरा. अग्नी व दृष्टी यांचा योग घडवून आणा. कुलदेवता / सद्गुरू यांच्या प्रतिमेसमोर सुखासनात बसा. त्यांच्या चरणकमलाकडे/पादुकांकडे एकटक दृष्टी लावा. डोळे सताड डघडे ठेवण्याचा प्रयत्न करा. एकटक पाहून डोळे थकतात, जड होतात, त्यांना पाणी येते. डोळे सताड उघडे ठेवण्यासाठी कोणत्या नसांवर कुठपर्यंत ताण येतो याकडे लक्ष द्या. डोळे मिटा पापण्यांची उघडझाप वेगाने पंधरा / वीस वेळा करा. ही कृती तीन वेळा करा. क्रिया करतांना कुलदेवता / सद्गुरू यांच्या दैवी गुणांचा विचार करा. असुरांचा संहार व साधु-संतांचे रक्षण, समाजउद्धार, एकूणच त्यांच्या धर्मकार्याचा, समाजकार्याचा विचार करा. याच प्रकारचे कार्य करून कुलदेवता/सद्गुरू यांची पाद्यपूजा आपल्याला करायची आहे. त्यासाठी त्यांचेकडे शक्ती व सामर्थ्य यांची याचना करा. आशीर्वाद मागा. सूर्यदर्शनाच्या या तीन प्रकारातून एक पद्धत वापरा. सूर्यदर्शन दररोज सूर्यतेजामुळे डोळे आणि डोके यांचे कार्य सुधारते. दृष्टी व दृष्टीकोन तसेच सूर्यनमस्कार एक साधना घ्या. १७०