पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाल्यावर सूर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी पुढील बारा तास अधिरतेने वाट पाहणे सुरू होते. • सकाळ सायंकाळ संध्याविधीचा परिपाठ उघड्यावर करीत असल्यास सूर्यदर्शनासाठी वेगळा वेळ द्यावयाची आवश्यकता नाही. संध्याविधी करतांनाच सूर्यदर्शन घ्या. एक-दोनदा जरी वरील प्रकारे सूर्यदर्शनाची प्रचिती घेतली तरी आपण या अग्नीतत्त्वाशी एकरूप होतो. बारा तासांनी याचा पुन्हा अनुभव घेण्यासाठी प्रतिक्षा सुरू होते. पण प्रत्येकाला अनेक व्यवधाने असतात. प्रयत्न करूनही दररोज सूर्योदय- सूर्यास्त याची वेळ सांभाळणे शक्य होत नाही. सूर्यदर्शन घेता येत नाही. याला अनेक कारणे आहेत. या सर्वच अडचणी दूर करणे आपल्या हातात नसते. यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन घेण्याची वेळ बदलायची. वेळ बदलली की सूर्यकिरण तप्त व तीव्र होणार. वरील पद्धतीत योग्य तो बदल करणे अपरिहार्य होते. ते बदल कोणते याचा विचार करू. अर्थात एक मात्र निश्चित आहे की वरील पद्धत ही सूर्यदर्शन घेण्याची आदर्श पद्धत आहे. त्याला दुसरा पर्याय देता येईल पण दोघांमध्ये दूध व ताक इतका फरक आहे. ताकावर तहान भागते का ते बघू. सूर्योदयाची वेळ पकडता आली नाही तरी त्यानंतर सकाळी तीन एक तासापर्यंत सूर्यदर्शन घेता येते. (सकाळी ९.३० / १०.०० पर्यंत) . ● घराच्या बाहेर पडल्यावर सुरक्षित ठिकाणी उन्हात सूर्याकडे तोंड करून उभे रहा. • डोळ्यांच्या पापण्या हळूवारपणे बंद करून सूर्याकडे पहा. • गायत्री मंत्र किंवा तेराक्षरी रामनामाचा जप तीन वेळा सावकाश करा. • जप पूर्ण होईपर्यंत तुमची दृष्टी गडद तांबड्या रंगाने व्यापली जाईल. • त्यानंतर खालील श्लोक म्हणा. श्लोक येत नसल्यास त्याच्या अर्थाची उजळणी करा. हीरण्मयेन पात्रेन सत्य स्थापिहितं मुखम् तत्त्वम पूषण अपावृणू सत्य धर्माय दृष्टये ।। सूर्यनमस्कार एक साधना १६९