पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्या. . अनाहतचक्रावर लक्ष केंद्रित करा. • छातीच्या मध्यभागी श्वसनाची कंपने स्वीकारा. • (बजरंगबली छाती उघडून राम-लक्ष्मण-सीता यांच्या प्रतिमा दाखवितो आहे.) • छाती थोडी फुगलेली, वर उचललेली. • पोट ताणरहित, सरळ. • उगवत्या सूर्याकडे एकटक, पापण्या स्थिर ठेऊन ( एक / दोन मिनिटे) बघत रहा. • ही क्रिया करतांना सूर्यतेज, सूर्यमंत्र, सूर्यशक्ती याचा विचार करा. • एकटक पाहून डोळे थकतात, जड होतात, त्यांना पाणी येते. डोळे सताड उघडे ठेवण्यासाठी कोणत्या नसांवर कुठपर्यंत ताण येतो याकडे लक्ष द्या. लगेच डोळे मिटा पापण्यांची उघडझाप वेगाने पंधरा / वीस वेळा करा. • डोळे बंद करा. बंद डोळ्यांना दिसणारे सूर्यबिंब पकडा, मोठे करा, त्याच्याशी एकरुप व्हा. • डोळे उघडा. सूर्यबिंबाकडे एकटक पहा.... ही क्रिया पुन्हा करा. • सूर्याच्या दिव्य तेजाने सर्व अंग पुलकित होत आहे याकडे लक्ष द्या. • डोळ्यांवर होणारा सूर्यतेजाचा परिणाम अनुभवा. • शरीर-मन-बुद्धी यावर होणारा सूर्यतेजाचा परिणाम अनुभवा. सूर्यदर्शनाचा कालावधी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर साधारणपणे ०८/ १०/१२ मिनिटे येवढाच ठेवा. • हा आठ ते बारा मिनिटांचा वेळ - ते ठिकाण, त्याची समुद्र सपाटीपासून असलेली उंची व ऋतू यावर- कमी / जास्त होऊ शकतो. • बंद डोळ्यांना दिसणारे सूर्यबिंब आनंदऊर्जेचा स्त्रोत आहे. सूर्योदयाचे दर्शन सूर्यनमस्कार एक साधना १६८