पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वतंत्रपणे सूर्यदर्शनाची प्रत्यक्ष अनुभूती शरीरस्तरावर घेण्याचा प्रयत्न करू. हाच अनुभव सूर्यनमस्कार घालतांना दररोज येणार आहे याची खुणगाठ पक्की करायची आहे. सूर्योदयाचे व सूर्यास्ताचे दर्शन दररोज घ्यायचे आहे. दररोज किमान सूर्योदयाचे दर्शन घ्याच. • आसनासाठी कांबळा किंवा धाबळी याचा वापर करा. यातून उष्णतेचे वहन होत नाही. तसेच यावर किडा-मुंगी- जंतू येऊ शकत नाहीत. • आसनाचे आतील भागावर स्वच्छ रुमाल टाका. रुमालाचे टोक जमिनीवर येणार नाही हे बघा. ● • आसनावर मांडी घालून बसा. • पाठीचा कणा समस्थितीमध्ये ठेवा. शरीर सैल, ताणमुक्त, आरामात ठेवा. सूर्यदर्शनास अवधी असल्यास 'करन्यासाची कृती करा'. (संदर्भ घ्या- पूर्वार्ध) ● • करन्यासाच्या शेवटच्या क्रियेमध्ये हातांच्या दोन्ही पंजांवर चुंबकीय आकर्षणाची कंपने जाणवतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला. या आकर्षण शक्तीला वैश्विकशक्ती, प्राणशक्ती, सूर्यतेज, आत्माराम इत्यादी अनेक नावांनी संबोधिले जाते. अध्यात्मामध्ये यालाच ब्रह्म-माया, विष्णू-वैष्णवी, पुरूष-प्रकृती, जीव- शीव, क्षेत्र - क्षेत्रज्ञ अशी अनेक विशेषणे आहेत. शास्त्रीय परिभाषेत हे शरीरातील चुंबकाचे उत्तर-दक्षिण ध्रुव किंवा धन - ऋण विद्युतभार आहेत. व्यवहारामध्ये यालाच आपण जोम- उत्साह - चैतन्य - आनंद या नावाने ओळखतो. या ब्रह्मचैतन्यामुळेच आपल्या शरीराच्या सर्व शारीरिक व मानसिक क्रिया घडत असतात. हाताचे पंजे चेहऱ्यावर ठेवा. बोटे कपाळावर ठेवा. हातावर जमा झालेली प्राणशक्ती शरीरामध्ये पुन्हा संक्रमित करा. यामुळे चेहऱ्यावरील पेशी अधिक प्रमाणात सूर्यतेज स्वीकारण्यास सक्षम होतात. • वरील सर्व क्रिया करतांना आपल्या आईचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आणा. श्वासोच्छ्वास जसा आहे तसा साक्षीभावाने बघा. त्याकडे त्रयस्तपणे फक्त लक्ष सूर्यनमस्कार एक साधना . १६७