पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्कार हा कायिक सूर्योपासनेचा एक प्रकार आहे. ती ब्रह्मकर्मांतर्गत नित्यकर्म स्वयंसाधना आहे. स्थूल शरीर व सूक्ष्म चैतन्याची पूजा आहे. स्थूल शरीरप्रकृतीच्या आठ अंगांचा वापर करून सूर्यनमस्काराची साधना करायची आहे. सूक्ष्म चैतन्याच्या अधीन होऊन पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार या 1 अष्टधा प्रकृतीला विकारमुक्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांना वैश्विकचैतन्य म्हणजेच प्राणतत्त्वाचा अधिकाधिक पुरवठा करून शरीरातील पंचमहाभूते व त्रिदोष यांचे संतुलन प्रस्थापित करायचे आहे. आपले आरोग्य व आनंद वृद्धिंगत ठेवायचे आहेत. सर्वांगीण व्यक्तिमत्व स्वयंभूरित्या प्रत्यक्षात येते याचा अनुभव घ्यायचा आहे. यासाठी वचसा-मनसा- दृष्ट्या सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाणी आणि मन यांचा उपयोग कशासाठी करायचा ? कसा करायचा? याचा उहापोह उत्तरार्ध या भागात समंत्रक सूर्यनमस्कार या शीर्षकाखाली केलेला आहे. या ठिकाणी अग्नी आणि दृष्टी यांचा योग घडून आणण्याचा प्रयत्न कसा करता येईल याबद्दल थोडा विचार करू. आहार व दिनचर्या याबद्दलही थोडी माहिती घेणार आहोत. सूर्यदर्शन मणिपूरचक्र किंवा नाभीचक्र हे आपल्या शरीरातील अग्नीचे अधिष्ठान आहे. मणिपूर चक्राचा प्रभाव आपल्या डोळ्यावर आणि मेंदूवर होतो. या ऊर्जाचक्राचे स्थान नाभीप्रदेश आहे. या भागातील सर्व अवयवांवर या ऊर्जाचक्राचा अधिकार चालतो. भूक लागणे, खाल्लेल्या अन्नाचे पचन होणे व पुन्हा भूकेची संवेदना होणे तसेच शरीराला अन्न रसातून ऊर्जा पुरविणे हे या ऊर्जाचक्राचे कार्य आहे. सूर्यनमस्कार स्थिती सहा, साष्टांगनमस्कारासन यामध्ये या ऊर्जाचक्राचा प्रत्यक्ष वापर केला जातो. इतर भूवंदन आसनामध्ये याचा अप्रत्यक्ष वापर केला जातोच. प्रत्येक आसन करतांना डोळे / दृष्टी याबद्दल सूचना दिलेल्या आहेतच. आता 1 भूमीरापोऽनलो वायू: खं मनो बुद्धिरेवच। अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ।। पाच भूते तीन गुण। आठ झाली दोन्ही मिळोन। म्हणूनी अष्टधा प्रकृति जाण। बोलिजेते ।। ग्रंथराज दासबोधि ।। सूर्यनमस्कार एक साधना श्रीमद्भगवद्गीता ७/४ ११/१/७ १६६