पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋणनिर्देश ग्रंथाच्या मुखवस्त्राला फुले - बिल्वपत्र वाहतात. मनोभावे नमस्कार करतात. नंतर ग्रंथाचे वाचन केले जाते. स्तोत्र - पाठ - मंत्र यांच्या द्रष्टा ऋषीचे स्मरण प्रथम केले जाते. मग पठणाला सुरुवात होते. लेखकाचे मनोगत, प्रस्तावना, आशीर्वाद, ऋणनिर्देश हा भागही ग्रंथाच्या मुखवस्त्रामध्येच येतो. कारण यानंतरच मूळ विषयाला सुरुवात होते. प्रथम ऋणनिर्देश नंतर विषयाला सुरुवात. काही ऋण लगेच सव्याज परत फेडायचे असतात. कारण तेथे व्यवहाराची देवाण घेवाण असते. काही ऋण अंशत: फेडता येतात. इतर सर्व ऋण या दोन्हींच्या पलीकडले असतात. ते परत करता येत नाहीत किंवा त्याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही. या तिसऱ्या प्रकारच्या ऋणांत राहणे हेच आनंदमय असते. कारण यामध्ये व्यवहार किंवा मदत नसते. तो एक आधार असतो. मनापासून दिलेला आशीर्वाद असतो. या आधारावरच स्वीकृत कार्य नेहमी प्रगती पथावर असते. हा आधार कायम स्वरूपी असतो. त्याच्या ऋणात राहणे, त्याचे स्मरण करणे ही आपली प्रेरणा शक्ती असते. आभार मानून किंवा थँक्यू म्हणून हा विषय संपविता येत नाही. म्हणून या आकाशा एवढ्या आशीर्वादांचा फक्त ऋणनिर्देश करायचा. माझी सूर्यनमस्कार साधना बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. निवृत्तीनंतर स्वत:च्या शरीर स्वास्थ्याची अमाप चिंता होती. काळजी करायला आणि घ्यायलासुदधा हाताशी भरपूर फावला वेळ होता. त्यामुळे सूर्यनमस्कार साधनेत कुठेही खंड न पडता ती अधिक चांगल्या पद्धतीने करता आली. तीर्थयात्रा, आध्यात्मिक शिबिरे, पारायणे इत्यादी चालू होतीच. ज्या ज्या वेळी समर्थस्थानावर गेलो त्या त्या वेळी साधनेमध्ये वेगळाच अनुभव मिळत होता. सूर्यनमस्कार साधनेतील आशय कक्षा रुंदावत होत्या. तेथील वातावरण व रामदासी दोन्ही घटक, सूचक-मार्गदर्शन करीत होते. शुभाशीर्वाद देत होते. त्याचा आधार घेत साधनेतील माझी प्रगती होत होती. टाकळी, सज्जनगड, शिवथर घळ, चाफळ, जांबसमर्थ, वाग्देवता मंदिर, ओझरखेड, तंजावर (तामिळनाडू) भीमराज गोस्वामी मठ व तेथील इतर मठ इत्यादी अनेक समर्थस्थानावर समर्थांचे सान्निध्य मिळाले. समर्थ वंशज प. पू. भूषण महारुद्र स्वामी यांची पाद्यपूजा करण्याचे सूर्यनमस्कार एक साधना xix