पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्राधान्य देणे ओघाने आलेच. ही वेळेची उणीव या कार्यपुस्तिकेमुळे दूर होईल. साधकाला गरज असेल तेव्हा आवश्यक ते संदर्भ हाताशी मिळतील, प्रशिक्षण देणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकास प्रात्यक्षिकासाठी अधिक वेळ देता येईल. संस्थेला यातून अधिक प्रमाणात कार्यकर्ते तयार करता येतील. सूर्यनमस्कार प्राणायामाचे प्रशिक्षण वर्ग अनेक ठिकाणी सुरू करता येतील. जगातील प्रत्येक कुटुंब सूर्यनमस्कार प्रचार-प्रसाराचे केंद्र व्हावे, त्यातील प्रत्येक सदस्य सूर्यनमस्कार साधक - कार्यकर्ता व्हावा हे स्वप्न साकार होण्यासाठी आपलाही सहभाग मिळेल. असे अनेक उद्देश या कार्यपुस्तिकेतून सफल होतील अशी आशा आहे. प्रत्येकाच्या तारुण्य काळातील आरोग्य - आनंद अबाधित रहावा, वर्धिष्णू राहावा, भावी पिढी निरोगी, अव्यंग निपजावी हा या कार्यपुस्तिकेचा हेतू आपल्या सहकार्याने 'सफल संपूर्ण व्हावा ही अपेक्षा. - - महान सूर्योपासक सद्गुरू समर्थ रामदास स्वामींनी आपल्या सर्वांना सूर्यनमस्कार साधनेची प्रेरणा द्यावी. प्रभुरामचंद्रांनी सूर्यनमस्काराचे अंतिम ध्येय साकार करण्याची मनोकामना पूर्ण करावी अशी प्रार्थना आपल्या अंतरंगात असलेल्या सूर्यतेजाला करून प्रस्तावनेस पूर्णविराम देतो. दिनांक : १५/१/२०१२

मकरसंक्रांत प्रस्तावना मार्गदर्शक, अनेक सूर्यनमस्कार साधक ॥जय हिंद || ॥ जय महाराष्ट्र ।। ॥जय जय रघुवीर समर्थ || सूर्यासि करावे नमस्कार । देवासि करावे नमस्कार। सद्गुरुसी करावे नमस्कार । साष्टांगभावे ।। सूर्यनमस्कार एक साधना श्रीदासबोध-४/६/३. xviii