पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चल-अचल सृष्टीला जन्म देणारा आहे. त्याच्या शिवाय निसर्ग व त्यामधील जीवसृष्टीचे अस्तित्व शक्य नाही. आपल्या मातृभूमीची सेवा करण्यासाठी त्याला नमन करा. आपल्या आईच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शक्ती-सामर्थ्य देण्यासाठी त्याची प्रार्थना करा. पादहस्तासन हस्तपादासन (ॐ सूर्याय नमः) प्रमाणे. ११. ॐ अर्काय नमः - अर्क म्हणजे काढा. एखाद्या पदार्थाचे आटवून केलेले रसायन. अग्नीमुळे द्रावणातील अशुद्ध व अनावश्यक भाग काढून टाकला जातो. आपल्याला त्या पदार्थाचे शुद्ध स्वरूपातील प्रभावी रसायन (औषध) मिळते. सूर्य, त्याची उष्णता, त्याचा प्रकाश, त्याचे कार्य हे आपल्याला यशस्वी आयुष्यासाठी मार्गदर्शन करणारे सारभूत तत्त्व आहे. तो आपल्या प्रापंचिक व पारमार्थिक जीवनाचा दीपस्तंभ आहे. हा ज्ञानसूर्य आपल्यासाठी अंतिम सत्याचा मार्ग प्रकाशमान करतो. तो देत असलेल्या संदेशांचा स्वीकार आज्ञा म्हणून करा. त्या आज्ञांचे पालन करण्याची क्षमता व सामर्थ्य मिळावे म्हणून सूर्यनारायणाची प्रार्थना करा. ॐ मित्राय नमः या परिच्छेदामध्ये प्रणामासन याचे स्पष्टिकरण प्रणामासन दिलेले आहे. १२. ॐ भास्कराय नमः भास्कर या शब्दाचा अर्थ आहे भासमान, प्रकाशमान प्रकाश हे ज्ञान- विज्ञानाचे, शहाणपणाचे प्रतिक आहे. 'प्रज्ञानं ब्रह्म', हे ऋग्वेदाचे घोष वाक्य आहे. अज्ञान म्हणजे विस्मृती व ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. विस्मृतीमध्ये गेलेले सर्व ज्ञान स्मृतीमध्ये यावे यासाठी सूर्यनारायणाला नमन करा. स्मृती जागृत करण्यासाठी एकाग्र चित्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी काया-वाचा-जीवे- भावे समर्पण करण्याची क्षमता मिळावी म्हणून त्याची प्रार्थना करा. - प्रणामासन आणि मुद्रा या शरीर स्थितीमध्ये आसन आणि मुद्रा दोन्ही भाव येतात. मुद्रा करतांना आराम स्थिती असते. स्नायूंना ताण दाब नसतो. असते फक्त श्रद्धा, विश्वास आणि संपूर्ण समर्पण भाव. सूर्यनमस्कार एक साधना - १६०