पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐ भानवे नमः ॐ खगाय नमः ॐ पूष्णे नमः ॐ हिरण्यगर्भाय नमः ॐ मरीचये नमः ॐ आदित्याय नमः ॐ सवित्रे नमः ॐ अर्काय नमः ॐ भास्कराय नमः सूर्यनमस्कार तृतीय गट ॐ आदित्याय नमः ॐ सवित्रे नमः ॐ अर्काय नमः ॐ भास्कराय नमः अश्वसंचालनासन मकरासन साष्टांगनमस्कारासन भुजंगासन पर्वतासन अश्वसंचालनासन पादहस्तासन प्रणामासन प्रणामासन आणि मुद्रा ९. ॐ आदित्याय नमः आदित्य शब्दाचा अर्थ आहे आदितीचा मुलगा. आपण सर्व आदिमाया किंवा आदिशक्तीची प्रजा आहोत. याचा अन्वयार्थ आहे विश्वाच्या उत्पत्तीला सुरुवात सूर्यनारायणापासून झाली. तोच वैश्विकशक्ती, परमतत्त्व किंवा परमईश्वर यांचे स्वरूप आहे. सूर्य अग्नीचे प्रतिक आहे. अग्नी म्हणजे जीवन. आपल्या शरीरातील ऊब संपली की आपण थंड होतो. संपतो. अग्नी सूर्याचा वारसा आहे. आपण सर्व जीव याच वारसा हक्काचे भागधारक आहोत. अंतिम सत्याचा मार्ग प्रकाशमान करण्यासाठी त्याची प्रार्थना करा. अश्वसंचालनासन ॐ भानवे नमः अश्वसंचालनासन प्रमाणे. १०. ॐ सवित्रे नमः सवितृ म्हणजे सविता, जन्म देणारी माता. सूर्यनारायण सर्वोत्पादक आहे. सूर्यनमस्कार एक साधना १५९