पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक्षेपित संदेशाचे ग्रहण, वहन, कार्यवाही तसेच बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याचे प्रशिक्षण अखंडितपणे चालू राहते. या हिरण्यगर्भाला, जो आपले भरण- पोषण-संवर्धन-संचालन करतो, त्याला सर्वभावे नमन करायचे आहे. भुजंगासन - - भुजंग शब्दाचा अर्थ आहे सर्प, नागसर्प. नागाच्या चेहऱ्याखाली त्याचा फणा असतो. ती त्याची छाती किंवा फुफ्फुसे आहेत. नाग जमिनीचा पक्का आधार घेतो, डोके वर उंच उचलतो, दीर्घ श्वास घेतो आणि फणा काढतो. ज्या मणक्याचा आधार घेऊन तो डोके उंच उचलतो तो भाग चांगलाच सशक्त असतो. या अधिष्ठानाचा आधार घेऊन तो पुंगीच्या तालावर आनंदाने डोलतो. ८. ॐ मरीचये नमः मरिचि या शब्दाचा अर्थ आहे मृगजळ सूर्याची उष्णता व सूर्यकिरणे यामुळे वाळवंटामध्ये पाण्याचा भास निर्माण होतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या मृगजळांचा कर्ताकरविता सूर्यनारायणच आहे. सुख-दुखः, मोह- माया, माझे तुझे या मोहामध्ये प्रत्येकजण आयुष्यभर अडकलेला आहे. या सर्व प्रकारच्या मोहजालाचा स्वामी असणाऱ्या सूर्यनारायणाला वंदन करा. तिमिर / अज्ञान दूर करून अंतिम सत्याचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी त्याची प्रार्थना करा. पर्वतासन आसनातील नावाप्रमाणेच शरीराला पर्वताचा आकार द्यायचा आहे. पर्वत स्थिर, अचल आहे. आकाशाकडे त्याचे अनुसंधान अखंडित आहे. या आसनामध्ये स्वाधिष्ठान चक्र हे शरीराचे शिखर. त्याला ऊर्ध्व ताण स्थिती द्यावयाची आहे. संपूर्ण लक्ष विशुद्ध चक्राकडे द्यायचे आहे. सूर्यनमस्कार आठवा ॐ मित्राय नमः ॐ रवये नमः ॐ सूर्याय नमः सूर्यनमस्कार एक साधना प्रणामासन ऊर्ध्वहस्तासन हस्तपादासन १५८