पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐ मरीचये नमः ५. ॐ खगाय नमः ‘ख’ या शब्दाचा अर्थ आहे अवकाश, आकाश आणि गम् म्हणजे जाणे. जो आकाशातून मार्गक्रमण करतो तो. हे सूर्यतेज चलअचल सृष्टीमध्ये तसेच प्रत्येक अणूरेणुमध्ये आहे. हे सूर्यतेज सर्वविश्वाचे भरण-पोषण - संचलन करीत असते. या महारूद्राला नमस्कार करा. याचा सेवाव्रती होण्यासाठी बुद्धी आणि सामर्थ्य मिळण्यासाठी सूर्यनारायणाची प्रार्थना करा. मकरासन मकर या शब्दाचा अर्थ आहे मगर. पाण्यात व जमिनीवर राहणारा, सरपटणारा, विशाल प्राणी. मगर चालतांना शरीराचा पुढचा भाग जमिनीपासून वर उचलून धरते, शरीराची तिरकी किंवा उतरती स्थिती करून दुडक्या चालीने उड्या मारत पुढे सरकते. हे आसन करतांना मगर - चाल लक्षात ठेवावयास हवी. ॐ पूष्णे नमः - पुषन् शब्दाचा अर्थ आहे जो भरण पोषण करतो तो. आपल्या असण्यासाठी प्राणतत्त्वाची (सूर्यतेज, वैश्विकशक्ती) आवश्यकता निर्णायक आहे. सूर्यनमस्कारमध्ये ताण-दाब मिळालेल्या स्नायूंना या सूर्यतेजाचा पुरवठा अधिक प्रमाणात करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. या सूर्यतेजाला नमस्कार करा. त्याचे जवळ आरोग्यपूर्ण समृद्धी, दीर्घ आयुष्याची प्रार्थना करा. साष्टांगनमस्कारसन या आसनामध्ये आपण शरीराचे आठ अंग जमिनीला टेकवून नमस्कार करतो. हे आठ अंग म्हणजे पाच स्थूल शरीराचे अवयव व तीन सूक्ष्म शरीराचे अवयव. ते क्रमशा खालील प्रमाणे- छाती, कपाळ, पाय, हात, गुडघे आणि डोळे, वाचा, मन. सर्व शरीराचा वापर करून सर्वभावे सूर्यनारायणाची प्रार्थना करावयाची आहे. ७. ॐ हिरण्यगर्भाय नमः हिरण्यगर्भ शब्दाचा अर्थ आहे सुवर्णगर्भ ! सुवर्ण विश्वाचा सोन्याच्या अंड्यातून झालेला जन्म!! सजीवांमधील चयापचयाची क्रिया अखंडपणे चालू आहे. या रासायनिक प्रक्रियेमुळे अन्नाचे पचन होते. शरीराला ऊर्जा मिळते. शरीरातील सर्व मासपेशींची वाढ होते. त्यांचे प्रजनन होते. शरीराचा आकार, सौष्टव टिकून राहते. सूर्यनमस्कार एक साधना १५७