पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐ सूर्यायनमः ॐ भानवे नमः १. ॐ मित्रायनमः प्रभो (सूर्य) नारायणा कुरुक्षेत्रावर ज्याप्रमाणे अर्जुनाच्या रथाचे तू सारथ्य केलेस त्याप्रमाणे हा भवसागर पार करण्यासाठी मला मार्गदर्शन कर. मी तुझी प्रार्थना करतो. प्रणामासान आसन म्हणजे योगासन आसन शब्दाचा अर्थ आहे शरीराची स्थिर, शांत, स्तब्ध स्थिती सूयर्नमस्कारातील प्रत्येक आसन शांतपणे, सावकाश, शरीराची ओढाताण न करता करावयाचे आहेत. योग म्हणजे संयोग किंवा सुयोग. हा संतुलनाचा योग प्राणतत्व आणि स्नायुपेशींचे श्रम यांच्यामध्ये घडवून आणायचा आहे! सूर्यनमस्कार संकल्पनेचा आणि प्रत्यक्ष सूर्यनमस्कार सरावाचा संयोग घडवून आणावयाचा आहे. जीवात्मा व परमात्मा यांचा योग अनुभवायचा आहे. २. ॐ रवयेनमः 'रवि' या शब्दाचा अर्थ आहे तेज, प्रकाश, धवल कीर्ती, चेहऱ्यावरील तेज. हे प्रभो सूर्यनारायणा तुझ्या तेजोगुणांचा लाभ मला मिळावा म्हणून मी तुझी प्रार्थना करतो. ऊर्ध्वहस्तासन ऊर्ध्व शब्दाचा अर्थ आहे वरती, उंच. या आसनामध्ये हात डोक्यावर उंच उचलायचे. संपूर्ण शरीराला वरच्या दिशेला ताण द्यायचा आहे. ३. ॐ सूर्यायनमः सूर्य, या शब्दाचा अर्थ - उष्णता, ऊर्जा, कार्यक्षमता, शक्ती असा आहे. हे प्रभो सूर्यनारायणा जनताजनादर्नाची सेवा करण्याचा तुझा धर्म आचरणात आणण्यासाठी मला तुझी ऊर्जा दे. आशीर्वाद दे. - - हस्तपादासन या आसनामध्ये दोन्ही हात व पाय यांचा वापर करावयाचा आहे. खाली वाकून दोन्ही हात व पाय जवळ आणावयाचे आहेत. कंबर आतून वर उचलून थोडा वेळ स्थिर रहावयाचे आहे. ४. ॐ भानवे नमः । सूर्यनमस्कार एक साधना १५५