पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घोट्यापासून डोक्यापर्यंत सर्व स्नायू आणि सांधे पक्के आवळून धरा. हाताच्या मुठी पक्क्या आवळा. संपूर्ण शरीर पक्के आवळलेल्या स्थितीमध्ये धरून ठेवा. थांबा. श्वास सोडण्यासाठी तोंड उघडे ठेवा. संपूर्ण श्वास दोन टप्प्यामध्ये, आवाज करत, दमदारपणे बाहेर फेका. ही संपूर्ण क्रिया तीन वेळा करा. प्रत्येक वेळी विश्रांतीसाठी तीन सर्वसाधारण श्वास घ्या. सूर्यनारायणाची प्रार्थना प्रार्थना म्हणतांना शरीरावर असलेला अनावश्यक ताण काढून टाका. ध्येय: सदासवितृमंडलमध्यवर्ति नारायण: सरसिजासनसन्निविष्ट: केयूरवान् मकर कुंडलवान् किरीटी हारी हिरण्यमयवपुर्घृतशंखचक्रः ।। आपण प्रथम तीन समंत्र सूर्यनमस्कार घालणार आहोत. हे तीन सूर्यनमस्कार तुमच्या वेगाने जसे जमतील तसे घालायचे आहेत. वेळेचे बंधन नाही. हे तीन सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक आसनामध्ये शरीराच्या विशिष्ट भागावर दिलेला ताण-दाब याचा अनुभव घ्यायचा आहे. शरीराचा इतर भाग ताण- दाब रहत ठेवायचा आहे. पार्श्वभाग मोकळा आहे याकडे विशेष लक्ष द्यायचे आहे. - प्रत्येक चवथा सूर्यनमस्कार हा संथगतीने घालायचा आहे. प्रत्येक आसन सुरू करण्यापूर्वी सूर्यमंत्राचा उच्चार करायचा आहे. क्रमाने बारा सूर्यमंत्र म्हणून संपूर्ण बारा स्थितीचा सूर्यनमस्कार घालायचा आहे. घाईगर्दी न करता शांतपणे प्रत्येक आसन समजून-उमजून पूर्ण करायचे आहे. सूर्यनमस्कार स्थिती ०१ सावधान स्थिती, ०२ टाचेला टाच, अंगठ्याला अंगठा लावा, ०३ हात नमस्कार स्थितीमध्ये घ्या. सूर्यनमस्कार प्रथम गट ॐ मित्राय नमः ॐ रवयेनमः सूर्यनमस्कार एक साधना १५४