पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्कार आसन स्थिती सुरू करण्यापूर्वी आज वेळ कमी आहे म्हणून फक्त सूर्यनमस्कार घालावयाचे आहेत. या दृष्टीकोनातून सूर्यनमस्कारास सुरुवात करु या. सकाळची वेळ आहे. थंड, शांत, उत्साहवर्धक वातावरण आहे. शांत झोप, पूर्ण विश्रांती, पोट साफ, आंघोळ यामुळे तुमचे शरीर उत्साही व मन प्रफुल्लीत आहे. - आंघोळ करतांना पायावरील दाबबिंदू कार्यरत करण्यासाठी प्रत्येक तळवा दोन तीन मिनिटे दगडाने घासला आहे. आसनावर उभे राहून नेहमीप्रमाणे टाळ्या वाजवून हातावरील दाबबिंदू कार्यरत केलेले आहेत. कानाकोपऱ्यातील स्नायूपेशी खडबडून जाग्या व्हाव्यात त्यांनी पुढील ताण-तणावासाठी तयार व्हावे यासाठी पुढील दोन प्रकार करायचे आहेत. १) सद्गुरू वंदन ( आनंदमुद्रा) पूरक व्यायाम प्रकार एक प्रमाणे. २) सर्वांगसजगता - आसनावर सरळ उभे रहा. दोन पायांमध्ये ९-१० इंचाचे अंतर ठेवा. दीर्घश्वसन सराव केल्याप्रमाणे श्वास आत घ्या. कुंभक करा. दोन्ही पायाच्या तळव्यांनी जमीन जोरात दाबा. श्वास सोडा. हऽऽ! सोपं नाही. आता खोल - लांब श्वास घ्या. तो छातीमध्ये पकडा. खाली दिलेल्या क्रिया क्रमाने करा. क्रिया क्रमाने पायापासून डोक्यापर्यंत करावयाच्या आहेत. संपूर्ण लक्ष क्रियांकडे ठेवा. गुडघा आतून किंचित वाकविल्यासारखा करा. आता दोन्ही पायाच्या तळव्यांनी जमीन जोरात दाबा. मांडीला हात लावा. तेथील स्नायूंवर दाब पडल्यामुळे ते आवळले गेले आहेत, कडक झालेले आहेत. हाच दाब स्वाधिष्ठान चक्राच्या स्नायूंवर द्या. ते पक्के आवळून धरा. ही क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. अनाहत चक्राच्या स्नायूंवर दाब द्या. ते पक्के आवळून धरा. मणिपूर चक्राच्या स्नायूंवर दाब द्या, ते पक्के आवळून धरा. विशुद्ध चक्राच्या स्नायूंवर दाब द्या, ते पक्के आवळून धरा. सूर्यनमस्कार एक साधना १५३