पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आवश्यकता असते. सूर्यनमस्काराच्या नित्य व प्रदीर्घ साधनेतून सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण दररोज होत असते. याची योग्य प्रचिती योग्य पद्धतीने सूर्यनमस्कार घातले तरच येते. अन्यथा विपरित परिणामाची पुनरावृत्ती होत गेल्यास साधना खंडित होते. साधनेतील प्रगतीचे दरवाजे बंद होतात. हा धोका टाळण्यासाठी सूर्यनमस्काराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. सूर्यनमस्कार एक साधना या पुस्तकातील पूर्वार्ध या भागात सूर्यनमस्काराचे धार्मिक अधिष्ठान काय आहे किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास सूर्यनमस्काराचे नैसर्गिक न्याय तत्त्व कोणते हे सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कार्यपुस्तिकेमध्ये सूर्यनमस्कार योग्य पध्दतीने घालण्यासाठी काही मूलभूत मार्गदर्शन केलेले आहे. उत्तरार्ध या भागात व्यक्तिमत्व विकासाचा मूलाधार सूर्यनमस्कार हा सिद्धांत आचरणात आणण्यासाठी काही सूचना, शंका समाधान व साधनेसाठी स्तोत्र-मंत्र वगैरे दिलेले आहेत. सूर्योपासना हा सर्वधर्मियांचा वारसा आहे. पण सूर्यनमस्कार मात्र पुरातन भारतीय संस्कृतीने जगाला दिलेला अनमोल ठेवा आहे. याच्या साधनेतून वैश्विक कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य अबाधित राखता येते. प्रत्येक व्यक्ती रोग- व्याधी-विकार-व्यसन यापासून मुक्त होतो. अकाली मृत्यूपासून त्याची सुटका होते. अर्थात या सर्व गोष्टी आपोआप होणार नाहीत. त्यासाठी योग्य पद्धतीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. हा प्रयत्न काया-वाचा दृष्ट्या - मनोभावे - यथायोग्य पद्धतीने कसा करायचा याचे दिशादर्शक मार्गदर्शन करण्यासाठी श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक, ही विश्वस्त सर्वाजनिक संस्था प्रशिक्षण वर्ग आयोजित करत असते. पाच दिवसांचे सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग नियमितपणे सुरू असतात. प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६.३० ते ८.०० वैचारिक बैठक व सरावाची पूर्वतयारी आणि रविवार ते बुधवार सकाळी ६.३० ते ८.०० प्रत्यक्ष सराव व प्रशिक्षण असे वेळापत्रक असते. पाच दिवस दररोज दीड तास असे हे प्रशिक्षण सुरू असते. यामध्ये सूर्यनमस्कार स्वयंसाधनेची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी म्हणून साधकाला मदत करण्यात येते. अर्थात वेळेच्या बंधनामुळे वैचारिक भागापेक्षा प्रात्यक्षिकाला अधिक सूर्यनमस्कार एक साधना xvii .