पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्कार सरावातील पहिला सूर्यनमस्कार व शेवटचा सूर्यनमस्कार सारख्याच शारीरिक-मानसिक क्षमतेने घालावे हे येथे अभिप्रेत आहे. थकवा येणे, धाप लागणे, ताण-दाब सहन करण्याची शारीरिक क्षमतेची कसोटी घेणे हे यामध्ये अजिबात अपेक्षित नाही. अकालमृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनम् सूर्य पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहं ।। -: समर्पण :- जगातील सर्व समर्थभक्त व सूर्यनमस्कार साधक यांना माझा अष्टांग नमस्कार. आज तुम्ही सर्वांनी सूर्यनमस्काराची दीक्षा घेतलेली आहे. सूर्यनमस्काराचा गंडा बांधला आहे. सूर्यनमस्कार साधक झालेला आहात. दीक्षा देणारा गुरू, घेणारा शिष्य. मी फक्त एक माध्यम. सूर्यनमस्काराची माहिती देणारा. अंत:करणातील आत्मारामाकडून साधना शिकण्यासाठी दिशादर्शन करणारा. सूर्यनमस्कार साधनेची दीक्षा आत्मारामाने आपणाला दिलेली आहे. साधनेतील प्रचितीही तोच देणार आहे. तोच तुम्हाला समर्थ करणार आहे. त्या रामाचे दास व्हा. सौख्यकारी, शोकहर्ता बनण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रत्येकाच्या अंत:करणात असलेल्या समर्थ रामदास स्वरूपाला विनम्र भावे वंदन करून आजचे मार्गदर्शन पूर्ण करतो. सूर्यनमस्कार एक साधना १४९